आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Wife Jashodaben News In Marathi, Election

नरेंद्र मोदींसाठी जशोदाबेन चार धाम यात्रेवर, जाणून घ्या कोण आहेत जशोदाबेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्जा (गुजरात)- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जशोदाबेन त्यांची पत्नी असल्याचे निवडणूक शपथपत्रात जाहीर केल्यापासून त्या गायब आहेत. मोदी पंतप्रधान व्हावे या मनोकामनेसाठी जशोदाबेन चार धाम यात्रेवर गेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. दरम्यान, त्या चार धाम यात्रेवर गेल्याच्या वृत्ताला भाजपच्या गुजरात युनिटने आणि जशोदाबेन यांचा भाऊ कमलेश यांनी दुजोरा दिला आहे.
जशोदाबेन निवृत्त शिक्षिका असून प्रचंड धार्मिक प्रवृत्तीच्या आहेत. चाळीस महिलांच्या समुहासह त्या चार धाम यात्रेवर गेल्या असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये दाखविले जात आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याने उत्साही मीडियापासून वाचण्यासाठी त्या दुसऱ्या एका ठिकाणी गेल्या आहेत, अशी माहिती त्यांच्या नातलगांनी दिली आहे.
नरेंद्र मोदी यांनी माझ्या नावाचा एकदा तरी त्यांची पत्नी म्हणून उल्लेख करावा, अशी सुप्त इच्छा जशोदाबेन यांची होती. मोदींनी निवडणूक शपथपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याने ही इच्छा आता पूर्ण झाली आहे, असेही काही जणांनी सांगितले आहे.
जशोदाबेन यांनी गेल्या काही महिन्यांपासून उपवास सुरू केले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे अशी त्यांची मनोकामना आहे, असेही काही नातलगांनी सांगितले आहे.
यासंदर्भात जशोदाबेन यांचे ज्येष्ठ बंधू आणि किराणा दुकान मालक कमलेश म्हणाले, की नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे जशोदाबेन हिचा पत्नी म्हणून उल्लेख केल्याने तिची प्रार्थना सफल झाली आहे. आम्हाला याचा आनंद आहे. आम्ही सगळे मोदी पंतप्रधान व्हावे अशी प्रार्थना करतो. संघाचा प्रचारक होण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग केला. परंतु, त्यानंतर जशोदाबेन हिने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. सध्या तिने चपलांचा त्याग केला असून दिवसातून केवळ एका वेळी अन्न ग्रहण करते.
1968 मध्ये नरेंद्र मोदी आणि जशोदाबेन यांचे लग्न झाले. त्यावेळी दोघेही किशोरवयीन होते. निवृत्त झाल्यानंतर जशोदाबेन बंधू कमलेश आणि अशोक यांच्यासोबत राहतात. ब्राह्मणवाडा येथे त्यांचे पिढीजात घर आहे. नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या गावापासून ब्राह्मणवाडा 32 किलोमीटर अंतरावर आहे.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाल्या होता जशोदाबेन.... वाचा पुढील स्लाईडवर