आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तारखेला होणार शेवटच्या 'मन की बात'चे प्रसारण, आतापर्यंत 50 पेक्षा जास्त भाग झालेत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर देशातील नगरिकांशी संवाद साधण्यासाठी 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू केला होता. ठराविक दिवसांच्या अंतराने विशिष्ट विषयांवर पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधत राहिले. 'मन की बात' कार्यक्रमाचे आतापर्यंत 50 पेक्षा जास्त भाग झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसिद्ध होणार आहे. शेवटच्या भागाची तारीखही ठरली आहे.


23 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात मोदींनी सांगितले होते की, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'मन की बात'मधून भेटू. निवडणुकीमुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात 'मन की बात' कार्यरक्रमाचा एकही भाग प्रसिद्ध झाला नव्हता. आता 26 मे रोजी 'मन की बात'चा शेवटचा भाग प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.


'मन की बात' कार्यक्रम नेहमी रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो. त्याप्रमाणे मे महिन्यातील शेवटचा रविवार 26 तारखेला आहे. त्यामुळे येत्या 26 तारखेला 'मन की बात'चा शेवटचा भाग प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

 

आगामी 'मन की बात'चा विषय अजून ठरला नसला, तरी राजकीय विषय नसेल, असे म्हटले जात आहे. याचे कारण लोकसभा निवडणुकीचे निकालही 26 मेपर्यंत स्पष्ट झालेले असतील.


3 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'चा पहिला भाग प्रसारित झाला होता. 27 जानेवारी 2015 च्या भागात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा सहभागी झाले होते. बराक ओबामा हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे होते. ओबामांनी यावेळी अमेरिकेतील विविध धोरणांची भारतीयांना माहिती दिली होती.