आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी लाइव्ह : सांगा अँटनी, इटलीच्या सैनिकांना कुठे ठेवले?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कासरगोडू। केरळ पर्यटनासाठी जगप्रसिद्ध होते; परंतु त्याला पर्यटनाची नर्सरी करण्यात आले आहे. मेडिकल टुरिझम आणि आयुर्वेद क्षेत्रात केरळ पुढे जाऊ शकले नाही. राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळाली नाही. मच्छीमारांच्या मदतीसाठी उपग्रहाद्वारे माहिती आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे; परंतु तसे होताना दिसत नाही.
वडोदरामध्ये आज भरतील अर्ज
वडोदर्‍यात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सकाळी 11 वाजता नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्या सर्मथनार्थ वडोदर्‍यात राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड आणि चहाचे दुकान चालवणार्‍या किरण महिदा यांची उपस्थिती असेल. त्या अगोदर ते कीर्तिस्तंभापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रोड-शोदेखील करतील .
म्हैसूर (कर्नाटक) । काँग्रेस म्हणते, देशाला चौकीदाराची गरज नाही. सव्वाशे कोटी चौकीदारांची गरज आहे. शहजादे, काय तुमचे भावजीदेखील चौकीदार होतील का? कारगिल शहिदांच्या विधवांना दिली जाणारी आदर्श सोसायटीची घरे आपल्या सासूच्या नावे करणारे अशोक चव्हाण चौकीदार होतील? उत्तर द्यावे लागेल.
कर्नाटकाच्या बागलकोटमध्ये मोदी
कोप्पल (कर्नाटक) । येथील सरकार विकासाच्या विरोधात आहे. मनरेगा आणि इतर रोजगार देणार्‍या योजना केवळ काँग्रेस नेत्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी आहेत. 73 हजार गरीब कुटुंबांनी कोप्पलमध्ये रोजगारासाठी अर्ज केला आहे. गेल्या वर्षी चार हजार लोकांना 100 दिवसांचा रोजगार मिळाला. यूपीए सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या.
पाकिस्तानी सैन्याने आपल्या जवानांचे सर कलम करून त्यांची हत्या केली. आपल्या संरक्षण मंत्र्यांनी संसदेत मात्र दहशतवादी सैनिकांच्या वेशात येऊन त्यांनी हे कृत्य केल्याचे संसदेत सांगून टाकले होते. अँटनी यांच्या वक्तव्याने पाकिस्तानला मदत झाली आणि आपले जवान या वक्तव्याने नाराज होते. पाकिस्तानी मीडियाने अँटनींची खूप स्तुती केली होती.
कासगोड (केरळ) . नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केरळच्या कासरगोड व कर्नाटकातील जाहीर सभांना हजेरी लावली. मोदींनी आपल्या भाषणात अँटनी आणि ओमान चंडी यांना लक्ष्य केले. केरळमध्ये असताना दोन मच्छीमारांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. ए. के. अँटनी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या संरक्षण खात्याचे गंभीर नुकसान झाले आहे. त्या विषयी अँटनी यांनी देशातील जनतेला उत्तर दिले पाहिजे. सुरक्षा दलातील जवानांना अत्याधुनिक उपकरणे मिळाली नाहीत. त्याबद्दल अँटनी यांनी जनतेला उत्तर दिले पाहिजे. म्हणूनच ए. के. अँटनी आणि केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी दोन मच्छीमारांची हत्या करणार्‍या इटलीच्या सैनिकांना कोणत्या तुरुंगात ठेवले आहे, हे सांगावे.