आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुरात पहाटेच मिळाला ‘निराेप’; कार्यकर्त्यांचा सकाळपासूनच राज्यभर जल्लाेष

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रमाकांत दाणी |  नागपू
‘मुंबईमध्ये नवी सत्ता समीकरणे आकारास येत असताना पहाटे तीनच्या सुमारास उपराजधानी नागपुरातील देवेंद्र फडणवीस समर्थक नेत्यांना या नव्या समीकरणाची कल्पना देण्यात आली होती,’ अशी माहिती खुद्द फडणवीस यांचे समर्थक व नागपूरचे नूतन महापौर संदीप जोशी यांनी दिली. दरम्यान, फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त झळकताच नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.

महापौर संदीप जोशी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना या घडामोडींची कल्पना आपल्याला पहाटेच देण्यात आली होती, याची कबुली दिली. मात्र, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने विशेषतः अजित पवारांना सोबत घेऊन सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती भाजपच्या काही निवडक केंद्रीय नेत्यांनाच होती. त्यात प्रमुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश होता. गडकरी कालपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या संपर्कात होते ,असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या निवडक नेत्यांनाच या नव्या सत्ता समीकरणाची कल्पना थोडी अगोदर आली असली तरी नागपूरकरांना मात्र सकाळीच माहिती कळली.