आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाणे महापालिकेत भगवा फडकला, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची बिनविरोध महापौरपदी निवड  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रसंगी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी ठाण्यात जाऊन नगरसेवक आणि नवनिर्वाचित महापौरांची भेट घेतली

ठाणे- महापालिकेत शिवसेनेचे नरेश म्हस्के महापौरपदी आणि पल्लवी कदम यांची उपमहापैरपदी बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यात जाऊन नगरसेवक आणि नवनिर्वाचित महापौरांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंचे यावेळी शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभार मानले. मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असे एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले. 


आज ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी एकमताने मंजुरी दिली. सेना नेते एकनाथ शिंदे यांनी सभागृहात येऊन नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांचा सत्कार केला. ठाणे महापालिका सभागृहात बिनविरोध म्हणून सेनेचा महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदी पल्लवी कदम हे सभागृहात विराजमान झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या विनंतीवरुन राष्ट्रवादीने ठाणे महापालिका महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे  ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच असेल हे आधीच सिद्ध झाले होते.