आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री नर्गिस फाखरीने वर्षभर ज्याला दिली आपल्या घरात जागा, आज त्याचा फोटोही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ठेऊ इच्छित नाही : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कधीकाळी उदय चोप्राची गर्लफ्रेंड असलेल्या फाखरीच्या लव लाइफमध्ये अनेक उत्तर चढाव पाहायला मिळत आहेत. पहिले उदय आणि आता 5 वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेन्सोबतही तिचे ब्रेकअप झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, नर्गिवस आणि उदय चोप्रा बराच काळ सोबत होते. या रिलेशनशिप दरम्यानही दोघांचे नाते अनेकदा बिगडताना दिसले होते आणि अखेर दोघेही वेगळे झाले. उदयपासून वेगळे झाल्यानंतर नर्गिस म्यूजिक कंपोजर आणि डायरेक्टर मैट अलोंजो याला डेट करू लागली. 

 

2017 पासून दोघे होते लिव-इनमध्ये...
उदयनंतर नर्गिसला अलोंजो भेटला. 2017 पासून दोघेही लॉस एंजेलिसला लिव-इनमध्ये राहत होते. दोघेही नवीन वर्षात म्हणजेच 2019 मध्ये लग्न देखील करणार होते. पण आता बातमी येते आहे की दोघांचेही ब्रेकअप झाले आहे. 

 

दोघांचेही ब्रेकअप झाल्याची ही  खरी मनाली जाते आहे कारण नर्गिसने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अलोंजोचे फोटोज डिलीट केले आहेत आणि त्याला अनफॉलोही केले आहे. 

 

उदयच्या आईने दिली होती लग्नाची परवानगी... 

जेव्हा नर्गिस आणि उदय रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा दोघांच्याही लग्नासाठी उदयची आई पामेला चोप्रा यांनी होकार दिला होता. एवढेच नाही तर घरातले नर्गिसला वाहिनी म्हणायचे. 

 

यादरम्यानच नर्गिसने आपल्या इंस्टाग्रामवर अमेरिकन डायरेक्टर मैट अलोंजोसोबत आपले काही फोटोज शेयर केले होते. यामध्ये नर्गिस, मैटचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसत होती. तिने त्यावेळी एक व्हिडीओदेखील शेयर केला होता, ज्यामध्ये तिने मैटला किस केले होते. रिपोर्ट्सनुसार, मैटसोबत वाढणाऱ्या जवळीकीमुळेच उदयने तिला व्हाट्सअपवर मॅसेज पाठवून ब्रेकअप केले होते. 

 

नर्गिस कारणार होती लग्नाची अनाउंसमेंट... 
ब्रेकअपनंतर नर्गिस आपली फिल्म 'अजहर' आणि 'बैंजो' चे पोस्ट प्रोडक्शन वर्कसोडून न्यूयॉर्कला आपल्या घरी चालली गेली होती. इमरान हाशमीसोबतच्या फिल्म 'अजहर' चे प्रमोशन नर्गिसने हे सांगून टाळले होते कि तिला काहीतरी दुखापत झाली आहे. 

 

तेव्हा नर्गिसच्या एका मित्राने सांगितले होते, 'नर्गिसला ब्रेकअपनंतर नर्वस ब्रेकडाउन झाले आहे. आणि त्याचमुळे ती देश सोडून न्यूयॉर्कला आपल्या घरी गेली आहे. यादरम्यान नर्गिसची मानसिक स्थिति अशी नव्हती की ती कामाकडे लक्ष देऊ शकेन. 

 

सूत्रांकडूनदेखील कळले होते की नर्गिस लवकरच तिच्या आणि उदयच्या लग्नाबाबतीत खुलासा करणार होती. पण उदयने काढता पाय घेतला आणि नर्गिसला हा धक्का सहन झाला नाही. मात्र, एकवेळ अशी होती उदय लग्न करण्यासाठी अधीर होता. 

 

बातम्या आणखी आहेत...