Home | Gossip | Nargis Fakhri blasts on her pregnancy fake news

प्रेगनन्सीच्या खोट्या चर्चांवर भडकली अविवाहित बॉलिवूड अभिनेत्री, सोशल मीडियावर सर्वांना फटकारले, म्हणाली, 'अपमान करणे बंद करा, माझ्या वाढलेल्या वजनावर हे सर्व ? थोडी तरी लाज बाळगा 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 14, 2019, 11:37 AM IST

पहिल्या बॉयफ्रेंडने वॉट्सअॅपवर केले होते ब्रेकअप तर आजारी पडली होती अभिनेत्री... 

 • Nargis Fakhri blasts on her pregnancy fake news

  मुंबई : नर्गिस फाखरी सध्या आपली अपकमिंग फिल्म 'अमावस' साठी खूप चर्चेत आहे. प्रमोशनमुळे तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच नर्गिस जेवजापासून इंडियात परतली आहे. तिचे वजन वाढलेले दिसत आहे. दरम्यान एका मीडिया वेबसाइटने ही बातमी सांगितली होती की, नर्गिसचे वाढलेले वजन तिच्या प्रेगनन्सीमुळे आहे. हे काळातच नर्गिस खूप नाराज झाली आहे. नर्गिसने त्वरित त्या वेबसाईटला बॅक टू बॅक ट्विट करून सुनावले आहे आणि आपली चूक सुधारण्याची ताकीद दिली आहे. नर्गिसने ट्वीट केले, "हे खूप चुकीचे आहे, तुम्ही अशी चुकीची बातमी कशी चालवू शकता, आणि आणि माझा अपमान करत आहात कारण माझे वजन वाढले आहे. त्यानेही ही बातमी लिहिली आहे, त्याला माझ्याबद्दल कसलीच माहिती नाही आणि या बातमीतील एक-एक शब्द चुकीचा आहे. तुम्ही सत्य पडताळले पाहिजे"

  काही दिवसांपूर्वीच झाले नर्गिसचे ब्रेकअप...
  - नर्गिस फाखरीच्या लव्ह लाइफमध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळत आहेत. पहिले उदय चोप्रा आणि आता 5 वर्षे लहान बॉयफ्रेंड मॅट अलोंजो सोबतही तिचे ब्रेकअप झाले आहे.
  - उदयनंतर नर्गिसला अलोंजोच्या रूपात खरे प्रेम आणि खूप चांगला जोडीदार मिळाला. 2017 पासून दोघे लॉस एंजेलिसमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होते. दोघेही नवीन वर्ष 2019 लग्नही करणार होते. पण आता बातम्या येत आहेत की, दोघांचेही ब्रेकअप झाले आहेत.
  - दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या यामुळे खऱ्या मानल्या जात आहेत. कारण नर्गिसने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अलोंजोचे सर्व फोटोज डिलीट केले आहेत आणि त्याला अनफॉलोही केले आहे.

  उदयच्या आईने दिली होती लग्नाची परवानगी...
  जेव्हा नर्गिस आणि उदय रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा दोघांच्याही लग्नासाठी उदयची आई पामेला चोप्रा यांनी होकार दिला होता. एवढेच नाही तर घरातले नर्गिसला वाहिनी म्हणायचे. यादरम्यानच नर्गिसने आपल्या इंस्टाग्रामवर अमेरिकन डायरेक्टर मॅट अलोंजोसोबत आपले काही फोटोज शेयर केले होते. यामध्ये नर्गिस, मॅटचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसत होती. तिने त्यावेळी एक व्हिडीओदेखील शेयर केला होता, ज्यामध्ये तिने मैटला किस केले होते. रिपोर्ट्सनुसार, मैटसोबत वाढणाऱ्या जवळीकीमुळेच उदयने तिला व्हाट्सअॅपवर मॅसेज पाठवून ब्रेकअप केले होते.


  नर्गिस कारणार होती लग्नाची अनाउंसमेंट...
  ब्रेकअपनंतर नर्गिस आपली फिल्म 'अजहर' आणि 'बैंजो' चे पोस्ट प्रोडक्शन वर्कसोडून न्यूयॉर्कला आपल्या घरी चालली गेली होती. इमरान हाशमीसोबतच्या फिल्म 'अजहर' चे प्रमोशन नर्गिसने हे सांगून टाळले होते की, तिला काहीतरी दुखापत झाली आहे.

  तेव्हा नर्गिसच्या एका मित्राने सांगितले होते, 'नर्गिसला ब्रेकअपनंतर नर्वस ब्रेकडाउन झाले आहे. आणि त्याचमुळे ती देश सोडून न्यूयॉर्कला आपल्या घरी गेली आहे. यादरम्यान नर्गिसची मानसिक स्थिति अशी नव्हती की, ती कामाकडे लक्ष देऊ शकेन.

  सूत्रांकडूनदेखील कळले होते की नर्गिस लवकरच तिच्या आणि उदयच्या लग्नाबाबतीत खुलासा करणार होती. पण उदयने काढता पाय घेतला आणि नर्गिसला हा धक्का सहन झाला नाही. मात्र, एकवेळ अशी होती उदय लग्न करण्यासाठी अधीर होता.

Trending