आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांवरील अत्याचाराचे जास्त गुन्हे नोंद झालेल्या 4 राज्यांत गुगलवर सर्वाधिक सर्च ‘नारीशक्ती’ शब्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - ऑक्सफर्ड डिक्शनरीने नारीशक्ती शब्दास २०१८ चा हिंदी शब्द संबोधत नवी ओळख दिली. २७ जानेवारीला हा शब्द अधिकृतरीत्या शब्दकोशात समाविष्ट करण्यात आला. ही ओळख देण्यासाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेशने सर्वाधिक योगदान दिलेले आहे. गुगल ट्रेंड्सनुसार, संबंधित राज्यांत नारीशक्ती शब्द सर्वाधिक सर्च केला गेला. मात्र, या राज्यांमध्येच महिलांवरील अत्याचाराशी संबंधित गुन्ह्याची जास्त प्रकरणे दाखल झाली आहेत. नारीशक्ती शब्दनिवडची कथा मोठी रंजक आहे. 


यासंदर्भात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या डिजिटल मार्केटिंग हेड स्वाती नंदा म्हणाल्या, अनेक शब्द नारीशक्तीच्या तुलनेत जास्त सर्च करण्यात आले. मात्र, सबरीमाला, ट्रिपल तलाकसारख्या घटनांमुळे ज्युरी सदस्यांनी त्यास २०१८ चा हिंदी शब्द म्हणून निवडले. पॅनलमधील सदस्य नमिता गोखले म्हणाल्या, आम्ही निवडलेल्या शब्दाचा समाजावर खोल प्रभाव असावा हा आमचा उद्देश होता. देशातील महिला सबलीकरणाबाबतच्या आंदोलनात या शब्दास बळकटी देण्यासाठी सर्व पॅनलिस्टचे नारीशक्तीवर एकमत झाले. अखेर नारीशक्ती शब्दाने ही लढाई जिंकली.


नारीशक्तीवरील कविता सर्वात जास्त सर्च
इंटरनेटवर नारीशक्तीवरील कविता सर्वात जास्त सर्च झाली. याशिवाय सरकारने सुरू केलेेला नारीशक्ती पुरस्कार सर्च केलेल्या शब्दांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. 

बातम्या आणखी आहेत...