आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narrow Escape For Mayawatis Plane News In Marathi

मायावती थोडक्यात बचावल्या, औरंगाबादच्या सभेनंतर लखनौला विशेष विमानाचे चाक जाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- औरंगाबाद येथील प्रचार सभा आटोपल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती विशेष विमानाने लखनौला पसरल्या. परंतु, लखनौ विमानतळावर लॅंडिंग करताना त्यांच्या विशेष विमानाचे पुढेच चाक जाम झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र प्रसंगावधान राखत विमानाच्या वैमानिकाने विमान यशस्वीरीत्या उतरविले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील प्रचार सभा आटोपल्यावर मायावती विशेष विमानाने लखनौला परतत होत्या त्यावेळी लखनौ विमानतळावर ही घटना घडली. यावेळी त्यांचे सहकारी एस. सी. मिश्रा त्यांच्यासोबत होते. लखनौ विमानतळावर विमान लॅंड करण्याचा वैमानिकाने प्रयत्न केला तेव्हा विमानाचे पुढील चाक जाम झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर याची माहिती लखनौ विमानतळावरील एअर ट्राफिक कंट्रोलला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळावरील अधिकाऱ्यांनी लगेच अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि सुरक्षा जवान तैनात केले. परंतु, विमान सुरक्षितपणे उतरविण्यात वैमानिकाला यश आले.
विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेली लॅंडिंगसारख्या पद्धतीने विमान उतरविण्यात आले. त्यानंतर विशेष विमानातील तांत्रित दोष दूर करण्यात आला.