आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2024 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानव उतरवणार, यासाठी नासाने खासगी कंपन्यांकडून शॉर्टकट पर्याय मागवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखत आहे. अंतराळ शर्यातीत सर्वात पुढे राहण्याचे हे पाऊल उचलण्यात येत आहे. नासा 2024 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाला उतरवणार आहे. यामुळे त्याला चंद्राच्या कक्षेतील स्पेस स्टेशनची आवश्यकता पडणार नाही. सोमवारी प्रेस रिलीज जारी करून नासाने ही माहिती दिली. यासाठी नासाने खासगी कंपन्याकडून विचार मागवले आहेत. 

 

खासगी कंपन्यांच्या पर्यायावर विचार करणार 
रिपोर्ट्सनुसार, नासाच्या अंतर्गत अभ्यास चंद्रावर पुन्हा मानव पाठवण्यासाठी तीन स्तरीय लँडिंग सिस्टमला पाठिंबा देत आहे. पण खासगी कंपन्यांनी चंद्रावर जाण्यासाठी पर्यायी आणि शॉर्टकट पर्याय देखील बघत आहे. 


> चंद्राच्या वरील कक्षेत गेटवे बनवण्याचे काम किचकट होऊ शकते. विशेषतः 2024 मानवाला चंद्रावर पाठवण्यादरम्यान हे कठीण होऊ शकते. भविष्यात मंगळ यात्रे दरम्यान याचा उपयोग करता येऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. 


> तज्ज्ञांच्या मते पृथ्वीवरून स्पेसक्राफ्टला चंद्राच्या खालील कक्षेत पाठवता येऊ शकते. यानंतर त्यांना लँडरच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात यावे. अपोलो मिशनमध्ये हे तंत्र वापरण्यात आले होते. 


चंद्रावर गेटवे बनवण्याचा फायदा काय?
नासाने मानवाला नवीन पद्धतीने चंद्रावर पाठवण्यासाठी कंपन्यांकडून 2 ऑगस्टपर्यंत विचार मागवले आहेत. त्यावर विचार केल्यानंतर नासा पुढील निर्णय घेणार आहे. चंद्राच्या वरील कक्षेत स्पेसक्राफ्ट स्थापित केल्यामुळे त्याच्या इंधनाची बचत करता येऊ शकते. यामुळे स्पेसक्राफ्ट नंतर पुढे मंगळ ग्रहापर्यंत पाठवणे सोपे होईल.