आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळात गुन्हेगारी घडल्यास कोणत्या देशाचे पोलिस करणार तपास? येथे जाणून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- नासातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन(आयएसएस) मधून बँक खाते हॅक करुन त्यात फेरफार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. नासामधील टॉप मोस्ट अॅस्ट्रोनॉट अॅनी मॅकक्लेन यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. त्यांनी 2014 मध्ये वायुसेनेचे माजी अधिकारी समर वॉर्डन यांच्यासोबत अॅनीचे लग् झाले. चार वर्षानंतर 2018मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 3 डिसेंबर 2018 ला अॅनी नासाकडून 6 महिन्यांच्या अंतराल मिशनसाठी नियुक्त झाल्या आणि जानेवारीमध्ये आयएसएसला गेल्या. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी अंतराळातून आपल्या माजी पतीचे बँक खाते हॅक करून त्यात पैशांची हेराफेरी केली आहे.

24 जून 2019 ला मॅकक्लेन पृथ्वीवर परत आल्या. या 6 महिन्या त्यांनी अंतराळातूनच वॉर्डनच्या बँक खात्यात फेरफार केली. मार्चमध्ये याची माहिती वॉर्डनला मिळाली. वॉर्डनने फेडरल ट्रेड कमीशनमध्ये याची तक्रार दाखल केली. तपासात नासाच्या कॉम्प्यूटरमधून बँक खाते हॅक झाल्याचे समोर आले. बँकने अटोर्नीला याचे पुरावेही दिले.

मार्चमध्ये खात्यात फेरफार केल्यामुळे चर्चेत आली अॅनी
नासाने मार्चमध्ये झालेल्या तक्रारीवर तत्काळ कोणताही कारवाई केली नाही, या दरम्यान स्पेसवॉकसाठी दोन महिलांची निवड झाली, त्यात अॅनीचे नाव होते, यामुळे तिला आणखीनच प्रसिद्धी मिळाली. पण नंतर स्पेसवॉकला एजंसीने स्पेस शूट आणि सेक्सिज्मला चालना देण्याचा आरोपामुळे रद्द केले.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रकरण अंतराळाशी जोडलेले आहे, त्यामुळे यात फेडरल ट्रेड कमीशन आणि पोलिस काहीच हस्तक्षेप करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण नासाकडे सोपवले. नासाने हे प्रकरण अंतराळ तपास अधिकारी इंस्पेक्टर जनरलकडे सोपवले. या प्रकरणाला आता विशेष अधिकाऱ्यांचे एक पथक तपासत आहे. स्पेस एजंसी नासाने अॅस्ट्रोनॉट मॅकक्लेनच्या कामाची प्रशंसा केली आहे, पण वयक्तिक प्रकरणांवर काहीच बोलले नाही. लेफ्टिनेंट कर्नल मॅकक्लेनने एअरफोर्समध्ये आपले करिअर बनवले. त्या इराकमधील युद्धातही सामील होत्या.