आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NASA चे मार्स लँडर InSight मंगळ ग्रहावर उतरले, स्पेसक्राफ्टवर प्रथमच नजर ठेवणार दोन छोटे सॅटेलाइट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेची अंतराळ संशोधन संघटना नासाचे रोबोटिक मार्स लँडर सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री 1:24 वाजता मंगळावर यशस्वीरित्या उतरले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, दोन एक्सपेरिमेन्टल सॅटेलाइट्सने एखाद्या स्पेसक्राफ्टचा पाठलाग करताना त्यावर नजर ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी नासाला 99.3 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 7,044 कोटी रुपये खर्च आला आहे. हे दोन्ही सॅटेलाइट मंगळ ग्रहावर पोहोचणाऱ्या स्पेसक्राफ्टपासून 6000 मैल मागे जात होते. नासाने याच वर्षी 5 मे रोजी कॅलिफोर्नियाच्या वंडेनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरून अॅटलस व्ही रॉकेटच्या माध्यमातून मार्स लँडर लॉन्च केले होते. 

 

उपग्रहांना डिझ्नी कॅरेक्टर्सची नावे...

इनसाइटसाठी लँडिंग करताना लागलेली सात मिनिटे सर्वात महत्वाची ठरली. याचवेळी मोहिमेचा पाठलाग करणाऱ्या दोन सॅटेलाइटवर जगभरातील अंतराळ संशोधकांचे लक्ष होते. या उपग्रहांना Disney च्या कॅरेक्टर्स प्रमाणे 'वॉल-ई' आणि 'ईव' अशी नावे देण्यात आली आहे. याच उपग्रहांनी इनसाइट मंगळावर उतरतानाची संपूर्ण माहिती पृथ्वीवर पाठवली. नासाने या संपूर्ण मोहिमेचे थेट प्रक्षेपणही केले. 

 

इनसाइट लँडरचा अर्थ आणि काही खास वैशिष्ट्ये...
> 358 किलो वजनी इनसाइटचे या मोहिमेचा फुल फॉर्म 'Interior Exploration using Seismic Investigations असा आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने चालणारे हे यान 26 महिने पर्यंत काम करत राहील असे डिझाइन करण्यात आले आहे. 
> 7000 कोटी रुपयांचे या मिशनमध्ये अमेरिकेसह जर्मनी, फ्रान्स आणि युरोपातील 10 हून अधिक देशांचे संशोधक आहेत. 
> इनसाइट प्रोजेक्टचे प्रमुख संशोधक ब्रूस बॅनर्ट यांनी सांगितल्याप्रमाणे, ही एक वन टाइम मोहिम आहे. यातून 4.5 अब्ज वर्षांपूर्वी मंगळ, पृथ्वी आणि चंद्र यांसारखे ग्रह कसे बनले याचा अभ्यास केला जाईल. 

> यानचे मुख्य उपककरण सिस्मोमीटर (भूकंपमापक) आहे. हे फ्रान्सच्या अंतराळ संशोधन संस्थेने बनवले आहे. लँडिंग करताच 'रोबोटिक आर्म' चे काम मंगळाच्या पृष्ठभागावर सेस्मोमीटर लावणे आहे. दुसरे मुख्य टूल 'सेल्फ हैमरिंग' मंगळ ग्रहावर तापमानाचे प्रवाह रेकॉर्ड करणार आहे. 

> नासाने इनसाइट लँड करण्यासाठी एलीसियम प्लॅनिशिया नावाची लँडिंग साइट निवडली. या जागेवर मंगळाचा पृष्ठभाग अतिशय सपाट आहे. उतरणे सेस्मोमीटर लावणे आणि ड्रिल करणे या ठिकाणी सोपे आहे.
> इनसाइट मोहिम मंगळ ग्रहाच्या वातावरणात प्रवेश करताना त्याची ताशी स्पीड अंदाजित 12,300 मैल अर्थात जवळपास ताशी 20 हजार किमी एवढी होती. 

बातम्या आणखी आहेत...