आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाने सूर्याजवळ पोहोचणारे पार्कर अंतराळयान केले रवाना; ८५ दिवसांनी सूर्याच्या कक्षेत पोहोचणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेने सूर्याच्या दिशेने आपले पहिले पार्कर सोलार प्रोब हे अंतराळयान रवाना केले. हे अंतराळयान सूर्याच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून म्हणजे ४० लाख मैल अंतरावरून जाईल. सूर्याच्या चारही बाजूंना किती उष्णता आहे याचा शोध हे यान घेणार आहे. हे यान ८५ दिवसांनी सूर्याच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर ते पुढील ७ दिवसांत सूर्याला २४ प्रदक्षिणा घालेल. तत्पूर्वी शनिवारी पार्कर सोलार प्रोबचे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे टाळण्यात आले होते. रविवारी हे यान केप केनेवेरल येथील प्रक्षेपण स्थळापासून डेल्टा-४ या प्रक्षेपण यानाद्वारे अंतराळात रवाना करण्यात आले. 


पार्कर करणार सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास 
पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतर ९ कोटी ३० लाख मैल आहे. या मोहिमेत सूर्याच्या प्रभामंडळाचा सविस्तर अभ्यास करण्यात येईल. सूर्याच्या जवळचे वातावरण समजावे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या प्रकल्पावर नासा १०३ कोटी रुपये खर्च करत आहे. पार्कर हे अंतराळयान ९ फूट १० इंच लांब आहे. त्याचे वजन ६१२ किलो आहे.

 
११.३७ लाख लोकांची नावे आपल्यासोबत घेऊन गेले 
पार्कर या अंतराळ यानासोबत सुमारे ११ लाख लोकांची नावेही सूर्यापर्यंत पोहोचतील. या वर्षी मार्चमध्ये नासाने या ऐतिहासिक मोहिमेचा भाग होण्यासाठी लोकांकडून नावे मागितली होती. नासाला मेपर्यंत ११ लाख ३७ हजार लोकांची नावे मिळाली होती. ती मेमरी कार्डद्वारे यानासोबत पाठवली आहेत. 


पार्कर हे अंतराळयान डेल्टा-४ प्रक्षेपण यानाद्वारे रवाना करण्यात आले. 
पृथ्वीपेक्षा ५०० पट जास्त किरणोत्सर्गाचा सामना पार्कर या अंतराळयानाला शक्तिशाली उष्णता कवच बसवण्यात आले आहे. सूर्याच्या अगदी जवळचे तापमान सहन करता यावे हा त्याचा हेतू. सूर्याच्या जवळ पृथ्वीच्या तुलनेत ५०० पट जास्त किरणोत्सर्ग असतो. कार्बनचे हे कवच ११.४३ सेंटिमीटर जाडीचे आहे. अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे ३.३१ वाजता ते रवाना झाले. 

 

3-2-1… and we have liftoff of Parker #SolarProbe atop @ULAlaunch’s #DeltaIV Heavy rocket. Tune in as we broadcast our mission to “touch” the Sun: https://t.co/T3F4bqeATB pic.twitter.com/Ah4023Vfvn

— NASA (@NASA) August 12, 2018

 

 

 

बातम्या आणखी आहेत...