आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाचे सौरयान आज झेपावणार, 7 वर्षांत सूर्याच्या 24 परिक्रमा करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानव आता सूर्याच्या सर्वाधिक जवळ पोहोचणार आहे. नासाने पार्कर यान पाठवण्याची सर्व तयारी केली आहे. हे यान सूर्याच्या कक्षेत परिक्रमा करेल. ते यान तयार करण्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च आला आहे.

 

वॉशिंग्टन - अमेरिकेेची अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) शनिवारी पार्कर सोलर प्रोब यानाच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. विलंबाचे कारण स्पष्ट  नाही.रविवारी ते होईल. प्रक्षेपणापूर्वी हेलियम अलार्म वाजल्यामुळे प्रक्षेपण टाळण्यात आले. हे यान सूर्याच्या सर्वाधिक जवळ जाऊन त्याचा अभ्यास करेल. पार्करचे डिझाइन सूर्याच्या वातावरणात जाण्याच्या क्षमतेयोग्य तयार केल्याचा दावा संशोधकांनी केला. सन २०२४ पर्यंत यान सूर्याच्या ७ परिक्रमा करेल.

 

पार्कर सौर तपासाच्या मोहिमेत अनेक उपकरणे सोबत घेऊन जात आहे. हे यान सूर्याचा आतून व आजूबाजूचा प्रत्यक्ष अभ्यास करेल. सूर्याच्या वातावरणातील तापमान १० हजार अंश  फॉरेनहाइट का आहे ?  या रहस्याची उकल या सूर्यमोहिमेतून केली जाणार आहे. पार्कर यानाची ही मोहिम सात वर्षांची असून त्या दरम्यान पार्कर सूर्याच्या अतितप्त वातावरणातून २४ परिक्रमा करेल.

 

अमेरिकी संशोधक पार्कर यांच्या नावावरून यानाला दिले नाव

यानाचे नाव संशोधक युजीन पार्कर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहेे. पार्कर यांनी १९५८ मध्ये पहिल्यांदा सौर हवा असते, असे म्हटले होते. सूक्ष्म कण व चुंबकीय क्षेत्राच्या धारा असतात. हे प्रवाह सूर्यातून स्रवत असतात. या धारा वेगाने कोसळू लागतात. तेव्हा उपग्रह संपर्कावर परिणाम दिसतो.

 

- पार्कर ७ लाख २४ हजार किमी वेगाने उड्डाण करेल. हा यानाचा सर्वाधिक वेग होय. सूर्याच्या वातावरणातून २४ वेळा यान करणार भ्रमंती.

- इतिहासात पहिल्यांदाच मानवरहित अभ्यासाचा उद्देश सूर्यकक्षा तसेच वातावरणातील रहस्यांची उकल करणे असा आहे.       

- २०२४ पर्यंत पार्कर सूर्याच्या २४ परिक्रमा पूर्ण करेल. यानासोबत अनेक उपकरणेदेखील आहेत. त्यामुळे सखोल अध्ययनासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

 

> नासाची द टच सन मोहीम, तुम्ही जाणून घेऊ इच्छिता ते सर्व

 

हे यान सूर्याच्या  किती जवळून जाणार ?
समजा सूर्य व पृथ्वीला एक मीटर पट्टीवर ठेवल्यास यान सूर्याच्या चार सेंटिमीटरपर्यंत पोहोचेल. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १४९६ कोटी किमी आहे. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल अंतरावरून परिक्रमा करेल. यान सूर्याची छायाचित्रे घेईल. तापमानाचा अभ्यास करेल. सूर्याच्या जवळ जाणारे पार्कर हे जगातील पहिलेच यान ठरणार आहे.

 

तापमान कसे राहील?
सूर्याच्या जवळ असल्याने १४०० अंश सेल्सियस तापमान असेल. सूर्याच्या वातावरणाचे तापमान १० हजार अंश फॉरेनहाइटपर्यंत आहे.


काय यान खाक होईल ?
सूर्याच्या उष्णतेपासून बचावासाठी यानात १२ सेंटिमीटरचे जाड कार्बन हीट कवच लावलेले आहेत. पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या ५०० पट जास्त ऊर्जा शोषून घेण्याची त्याची क्षमता असते.


यान काय शोध घेणार ?
सूर्यातून निघणारी किरणे व सौर वादळ याचा शोध या मोहिमेतून घेतला जाईल. सौर मंडळाचा आपल्यावर परिणाम होतो. तंत्रज्ञान तर कधी यानावरही परिणाम होऊ शकतो. त्यातून माहितीच्या दळणवळणातही अडथळे येतात. पर्यावरणावरीही परिणाम होतो. सौर वादळांमुळे वीज केंद्राच्या कार्यातही अडथळा येतो. हे का घडते ? त्याचे उत्तर शोधण्याचाही मोहिमेचा उद्देश आहे.  

 

हे यान  कोणते रहस्य उलगडू शकेल ?
आपण उष्णतेच्या जवळ असतो तेव्हा आपल्याला उष्णता सहन होत नाही. आपण लगेच त्यापासून दूर होतो. सूर्याची गोष्ट वेगळी आहे. त्याची उष्णता १० हजार फॉरेनहाइट एवढी आहे. अगदी त्याच्या वातावरणात गेल्यास लाखो अंश सेल्सियस तापमान एवढी उष्णता आहे. हे रहस्य आहे. तारेदेखील असेच काम करतात. यापूर्वी कोणत्याही यानाने अशा प्रकारच्या उष्णतेचा सामना केलेला नाही.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, या मोहिमेविषयी अधिक माहिती व फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...