आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • NASA Scientists Create 10 Types Of Vegetables, Including Tomatoes And Radishes, With Create A Mars, Moon like Atmosphere.

नासाच्या वैज्ञानिकांनी मंगळ, चंद्रासारखे वातावरण तयार करून टोमॅटो-मुळ्यासह १० प्रकारच्या भाज्या उगवल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - नासाच्या वैज्ञानिकांनी मंगळ आणि चंद्रासारखे वातावरण आणि माती तयार करून त्यात पिके उगवण्यात यश मिळवले आहे. वैज्ञानिकांनी १० वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची शेती केली. त्यात टोमॅटो, मुळा, मोहरी, गाजर, पालक आणि मटर यांचा समावेश आहे. नासाच्या सहकार्याने नेदरलँडच्या वगेनिंगेन विद्यापीठाच्या संशोधकांनी हे काम केले आहे. त्यांनी सांगितले की, मंगळ आणि चंद्राच्या मातीवर घेतलेल्या पिकांच्या बियाही मिळवल्या आहेत. पुन्हा नवे पीक घेता यावे हा त्यामागील हेतू आहे. नासाच्या वैज्ञानिकांच्या मते, जर भविष्यात मंगळ आणि चंद्रावर मानवी वस्त्या तयार झाल्या तर त्यांच्यासाठी तेथे पिके उगवली जाऊ शकतील. पृथ्वीप्रमाणेच पिकांच्या बियांपासून पुन्हा पिके उगवली जाऊ शकतील. विद्यापीठाचे संशोधक वीगर वेमलिंक यांनी सांगितले की, ‘जेव्हा आम्ही या मातीत उगवलेले टोमॅटो लाल होताना पाहिले तेव्हा प्रचंड उत्साह वाटला. या शोधाद्वारे आम्ही शेतीचे ते शिखर गाठले आहे, जेथून आम्हाला भविष्यात दुसऱ्या ग्रहांवरही पिके उगवण्यात यश मिळेल.’ संशोधकांनी मंगळ ग्रह आणि चंद्राच्या पृष्ठभागाच्या वरच्या स्तरातून घेतलेल्या मातीत सामान्य माती मिसळून कृत्रिमरीत्या त्या ग्रहाचे वातावरण विकसित केले होते. पालकाचे पीक मात्र अपेक्षेनुसार आले नाही. हा अभ्यास ओपन अॅग्रिकल्चर जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 
 

चाचणीसाठी भारतीय वैज्ञानिकांचे मतही घेतले होते
संशोधकांनी या चाचणीसाठी भारतीय वैज्ञानिकांचे मतही घेतले होते. विशेषत: दोन्ही ग्रहांवर तेथील वातावरण पाहून भारताच्या अभ्यासानंतर या ग्रहांची माती तयार करण्यात आली. बिया तयार करणे आणि त्यानंतर पीक उगवणे यासाठी दोन्ही ग्रहांप्रमाणेच तापमान निश्चित करण्यात आले होते.