आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीच्या अगदी जवळून गेली धोकादायक उल्का, नासाला यामुळे होत आहे चिंता 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - नासाच्या इशाऱ्यानंतर नुकतीच एक भली मोठी उल्का (एस्ट्रॉयड) पृथ्वीच्या जवळून गेली आहे. नासाच्या मते यापासून पृथ्वीला काहीही धोका नव्हता, पण भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ए3 नावाचा हा उल्कापिंड पृथ्वीपासून 32 लाख किलोमीटर अंतरावरून गेला. पण पुढील शतकात आपण यापासून वाचू शकणार नाही. नासाच्या मते 32 लाख किलोमीटर ऐकायला फार जास्त वाटत असले तरी अंतराळाच्या भाषेत याला फार कमी मानले जाते. ताशी हजारों किलोमीटर वेगाने जाणाऱ्या या अॅस्ट्रॉयडसाठी हे अंतर फार जास्त नाही. 


याबाबत काळजी.. 
नासाने म्हटले आहे की पृथ्वीच्या जवळून गेलेल्या या उल्केचा वेग सेकंदाला 4.82 किलोमीटर होता. यावेळी यापासून बचावलो असलो तरी भविष्यात ही उल्का पृथ्वीला धडकून मानवाला धोका होऊ शकतो. अनेक शहरे आणि राज्ये यामुळे उध्वस्त होऊ शकतात. 


500 फुटांची उल्काही धोकादायक 
नासाच्या तज्ज्ञांच्या मते या उल्केचा आकार 490 फूट आहे. म्हणजे एक उल्का जवळपास 50 स्कूलबस एवढी असते. जर हजारो किलोमीटर ताशी वेगाने येणारी अशी उल्का पृथ्वीला धडकली तर होणाऱ्या विनाशाची कल्पनाही केली जाऊ शकणार नाही. पृथ्वीच्या आसपास एखादी 140 मीटरची एखादी उल्का असेल तर तो संपूर्ण देशासाठी सर्वात मोठा धोका असेल असे नासाचे म्हणणे आहे. 


पुढे वाचा, अणु बॉम्बपेक्षा 80 हजार पट अधिक नुकसान करू शकते.. 

बातम्या आणखी आहेत...