आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NASA,next Six Months, Aerospace Engineering, Design Various Elements, Artemis Mission 2024

चंद्रावर 2024 पर्यंत मनूष्य पाठवण्यासाठी 11 कंपन्यामध्ये स्पर्धा, 316 कोटींच्या किंमतीपर्यंतचे बनवले आहेत यान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिंग्टन(अमेरिका)- चंद्रावर 2024 पर्यंत पुन्हा एकदा माणसांना पाठवण्यासाठी नासाद्वारे 11 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. नासानुसार, पुढील सहा महिन्यांमध्ये एअरोस्पेस इंजीनिअरिंगच्या 11 कंपन्यामधून एका कंपनीची निवड करण्यात येईल, यामध्ये मिशनसाठी लागणाऱ्या आवश्यक उपकरणांच्या डिझाइनचे काम पूर्ण करावे लागणार आहे. या मिशनअंतर्गत, स्पेस स्टेशन स्ट्रक्चर तयार करण्याची नासाची योजना असून याद्वारे गेटवेचे काम केले जाईल. या गेटवेमुळे चंद्राच्या पृष्ठभुमीवर मनुष्याच्या लँडिंगसाठी जागा शोधण्यास मदत होईल.


पुढील काही वर्षात चंद्राच्या खालच्या कक्षेत लॉन्च होणाऱ्या कॅप्सूलची निर्मितीचे काम सुरू होईल. नासाद्वारे निवडण्यात आलेल्या कंपन्याचे लक्ष फोकस आर्टमिस मिशनसाठी तीन वेगवेगळे प्रकारचे भाग तयार करण्यावर राहील. यामध्ये एक कॅप्सूल राहील ज्याद्वारे अॅस्ट्रोनॉट्स चंद्रपर्यंत जातील आणि तिथून परत येऊ शकतील.

 

पार्टनरशिपमध्ये हार्डवेअरवर लक्ष
नासा मुख्यालयात मानव-चांग अन्वेषण कार्यक्रमांचे संचालक मार्शल स्मिथ यांनी सांगितले की, "चंद्रावरून परत येण्याच्या वेगाला आम्ही अधिक गती देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही पारंपारिक पद्धत सोडून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्यने काम करत आहोत. आमची टिम लवकरात लवकर ही मोहिम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. याव्यतिरिक्त खासगी पार्टनरशिपची ही टिम चंद्राच्या पृष्ठभुमिवर मनुष्याचे पाऊल ठेवणाऱ्या एका विशिष्ट सिस्टमचाही अभ्यास करत आहे.


20 टक्के फंड कंपन्या भरणार
या कंपन्यांनी चंद्रावर पाठवण्यात येणाऱ्या रॉकेटचे मॉडल बनवले आहेत. यातील एका रॉकेटची किंमत 316 कोटी रूपये आहे. यासोबतच  प्रत्येक कंपनीला एकून खर्चाच्या 20 टक्के रक्कम द्यावी लागणारा आहे. या मोहिमेवर नासाची अपेक्षा आहे की, भविष्यातील मिशनवर कमी खर्च लागणार असून यामुळे करदात्यांचे ओझे कमी होईल.

 

या 11 कंपन्यामधून होणार निवड
1. एअरोजेट रॉकेटडाइन
2. ब्लू ओरिजिन
3. स्पेसएक्स
4. बोइंग
5. डायनेस्टिक
6. लॉकहीड मार्टिन
7. मास्टेन स्पेस सिस्टम्स
8. नोथ्रोप ग्रूमन इनोव्हेशन सिस्टम्स
9. ऑर्बिट बियॉन्ड
10. सियरा नेवादा कॉरपोरेशन
11. एसएसएल