आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासातील सोलापूरचा अभियंता फ्लोरिडात बीचवर बुडाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर/न्यूयॉर्क- अमेरिकेत फ्लोरिडा येथील नासा संस्थेत काम करणाऱ्या सोलापूरच्या तरुण अभियंत्याचा कोका बीचवर फिरायला गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला. फेसाळत्या लाटांच्या तावडीत तो सापडला. ही घटना मागील शुक्रवारी घडली. समी जाफर करजगी (वय ३७, रा. सहारानगर, होटगी रोड, सोलापूर, मूळ गाव मैंदर्गी, ता. अक्कलकोट) असे त्याचे नाव आहे. 


सहारानगरात जाफर करजगी व त्यांचे कुटुंब राहते. ते पुणे येथे सिंचन विभागात आरेखक अधिकारी होते. त्यांच्या पत्नी बीएसएनल कार्यालयात काम करतात. एक मुलगा पुण्यात बीई शिकतोय. समी हे २००५ पासून अमेरिकेत राहतात. त्यांचे शालेय शिक्षण लिटल फ्लॉवर येथे तर बारावी, बीई पदवी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली आहे. सुरुवातीला अमेरिकेत दोन वर्षे एमएस शिक्षण घेतल्यानंतर टेक्सास येथे अभियंता म्हणून एका कंपनीत कामाला लागले.  नासा या संस्थेत तीन महिन्यांपूर्वी  एका प्रोजेक्टवर काम मिळाले होते. मागील शुक्रवारी समी हे फ्लोरिडा येथे बीचवर गेले होते. त्यावेळी धोकादायक ठिकाणी पाण्यात गेले असता पाण्यात बुडाले. ही घटना पाहणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना पाण्यात बाहेर ओढले. त्यांना तातडीची वैद्यकीय मदतही मिळाली मात्र, त्यांचे प्राण वाचले नाही.


फेसाळत्या लाटांनी घेतला बळी... 
कोका बीच पोलिस विभाग आणि ब्रेव्हार्ड काऊंटी अग्निशामक दल यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तेथे उभे असलेल्या लोकांनी करजगी यांना पाण्याबाहेर ओढलेे, त्यांना तातडीची वैद्यकीय मदतही मिळाली पण त्याचा उपयोग झाला नाही. जीवरक्षक कर्मचारी तेथे त्यावेळी ड्यूटीवर उपस्थित नव्हते. तीन तासांपूर्वीच त्यांची सुटी झाली होती. करजगी गेले तेव्हा समुद्राला उधाण आले होते. फेसाळत्या लाटांनी करजगी यांना आत ओढले. हे ठिकाण धोकादायक आहे. त्यामुळे येथे लाल बावटे लावण्यात अाले होते. करजगी यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली.

बातम्या आणखी आहेत...