आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात नाशिक जिल्हा गारठला; ओझर 6, निफाड 8 अंश सेल्सियस तापमान

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नाशिक : राज्यामध्ये तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तपमानात वाढ झाली होती. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी आकाश स्वच्छ आणि निरभ्र असल्याने किमान तपमानात घट झाल्याने कडाक्याची थंडीमुळे जिल्हावासीय गारठले होते.ओझरला राज्यात निचांकी ६.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरवासीय सूर्यप्रकाशात उभे रहात होते. मात्र, आकाश स्वच्छ असल्याने काही वेळातच उन्हाचा चटका बसत होता.

मध्य महाराष्ट्रातमध्ये वातावरण कोरडे असल्याने किमान आणि कमाल तपमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात किमान तपमानाचा पारा सर्वाधिक घसरला असल्याने संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर गारवा जाणवत होता.

मध्यप्रदेश आणि हरियाणामध्ये गोलाकार वाऱ्याची स्थिती असल्याने महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बुधवार रात्रीपासून ढगाळ वातावरण नाहीसे होऊन आकाश स्वच्छ आणि निरभ्र झाले. त्यामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये पारा घसरला होता. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ओझर ६.६, निफाड ८.८, तर नाशिक शहरात १०.२ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली .गुरुवारी दिवसभर वातावरणात गारवा असल्याने नागरिकांना उबदार कपडे परिधान करण्याला पंसती दिली होती.

प्रमुख शहरातील किमान तपमान

शहर - किमान तपमान
ओझर - ६.६
निफाड - ८.८
नाशिक - १०.२
मालेगाव - १२.४
महाबळेश्वर - १३.४
पुणे - १४.८

असा राहणार अंदाज

मध्य महाराष्ट्रामध्ये आकाश स्वच्छ आणि निरभ्र रहाणार असल्याने किमान तपमानात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

चहा विक्रीत झाली वाढ

थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे परिधान करतात. मात्र, या वातावरणात गरमागरम पदार्थावर ताव मारण्यालाही पंसती दिली जाते. वातावरणात दिवसभर गारवा असल्याने चहाच्या मागणीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. - नागेश पुजारी, हाँटेल कपाळेश्वर
 

बातम्या आणखी आहेत...