आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्ताच नाचा, नाही तर फडच पेटवू; फडात गावगुंडांचा हैदाेस, कलावंतिणींचा विनयभंग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगणघाट घटनेनंतर नाशिकच्या साकुरात मद्यधुंद गावगुंडांचा हल्ला, २ गंभीर जखमी
  • पोलिसांत टाेळक्याविराेधात गुन्हा दाखल

नीलेश अमृतकर/ पीयूष नाशिककर

नाशिक - आपली कला सादर करून काेणी शृंगार उतरवत हाेते तर काेणी तान्हुल्याला छातीशी घेतलं हाेतं, काेणी कपडे बदलत हाेतं तर काेणी झाेपण्याच्या तयारीत असतानाच ५-६ मद्यधुंद गावगुंड राहुटीत शिरले आणि कलावंतिणींचा हात आेढत, जबरदस्ती करत आत्ताच आमच्यापुढं नाचा असा धिंगाणा घालत थेट त्यांच्या कपड्यांना हात घातला. फडातील बाप्ये साेडायला गेल्यावर त्यांनाच जबर मारहाण केली. त्यात आणखी ५-६ गुंड सामील झाले आणि मग महिलांचे कपडे आेढण्यापासून ते बाप्यांना लाठीकाठी व शस्त्राने जबर मारहाण या गावगुंडांनी केली. त्यात दाेघे गंभीर जखमी झाले. ही लज्जास्पद घटना घडली ती आदर्श ग्रामपंचायत म्हणून बिरुद मिरवणाऱ्या नाशिकच्या साकूर गावात. वाडीवऱ्हे पाेलिसांत गावातील गणेश व वैभव यांच्यासह टाेळक्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील साकूर या गावातील जत्रेत दरवर्षीप्रमाणे तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लाेकनाट्य तमाशा मंडळींचा शाे रात्री १२ वाजेपर्यंत रंगला हाेता. त्यानंतर सर्वत्र शांतता झालेली असताना आणि तमाशा मंडळीत आवराआवर सुरू हाेती. कलावंतीण आपला साजशंृगार उतरवत हाेत्या, तर राहुटीत काहीजणी कपडे बदलत हाेत्या. या  वेळी अचानक मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वैभव व गणेश हे दाेघे मित्र त्यांच्या कारने थेट राहुट्यांजवळ आले. या दाेघांनी थेट महिलांच्या राहुटीत घुसून आमच्यापुढे आत्ताच नाचा म्हणून त्यांना जबरदस्तीने बाहेर आेढू लागले. त्याच वेळी तमाशा मंडळीतील प्रमुख महिला कलावंतिणींना साेडवायला पुढे आल्या असता त्यांच्याच अंगावर हात टाकत त्यांनाही तूही नाच, यांना नाचव असे म्हणत धक्काबुक्की करू लागले. हा सर्व प्रकार पाहून तमाशा मंडळींचे मालक आविष्कार मुळे, देवानंद माेरे, विकास भारद्वाज हे धावले. त्यांनी गुंडांना राेखत जाब विचारून महिलांना साेडविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दाेघांपैकी एकाने हातातील फायटरने देवानंद माेरे याच्या ताेंडावर वार करत रक्तबंबाळ केले. तर विकासच्या डाेक्यात काठीने प्रहार करत खाली पाडले. हा प्रकार बघून इतर लहान मुली-महिलांचा आक्राेश झाला. एवढ्यावरही हे गावगुंड न थांबता ते महिलांचे हात, पाय, कपडे आेढत त्यांना बाहेर खेचतच हाेते. काही वेळातच या दाेघांचे साथीदारही या ठिकाणी येऊन त्यांनी धुडगूस घातला. या झटापटीत प्रमुख महिलेच्या गळ्यातील अडीच ताेळ्यांचे मंगळसूत्र तुटले, बांगड्या फुटल्या. तरीही या टाेळीचा धुडगूस सुरूच हाेता. महिलांनी मदतीच्या याचनेसाठी आरडाआेरड केली असता त्यांनी आताच नाचा, नाही तर फडच पेटवून देताे, एकेकाचा मुडदाच पाडताे अशी धमकी देत लाठ्याकाठ्या, राॅड दाखवत पाेलिस येत असल्याची चाहूल लागताच पळ काढला. अचानक हल्ला करून केला विनयभंग


आम्ही मेकअप उतरवत हाेताे, कपडे बदलत हाेताे, ते गुंड अचानक आले अन‌् थेट राहुटीत घुसले. आमच्यापुढे आत्ताच नाचा, आत्ताच नाचा असं अर्वाच्य भाषेत ते बाेलत हाेते. नकार दिल्यावर त्यांनी आम्हाला जबरदस्तीने बाहेर आेढलं, कपडे आेढले. विराेध केल्यावर त्यांचा माेर्चा इतर पाेरींकडे गेला. त्यांचाही या मवाल्यांनी नकाे तिथे हात लावत विनयभंग केला. अख्खा फड जाळून टाकू अशी धमकी दिली. अजूनही सगळेचजण भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांना पाेलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन कडक शिक्षा करावी हीच आमची मागणी आहे. 
- फिर्यादी पीडिता ताेंडावर वार, दात तुटले


आमच्या फडातील काही महिला कलावंतांना हाताला, त्यांची साडी धरून अोढू लागले. आमच्या लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी एेकलेच नाही. आम्ही त्यांना हटकले. तर त्यांनी वाद घालत इतरांना फोन करून बोलाविले. नंतर कारमधून ७ ते ८ जण आले आणि मारहाण केली. मी सोडविण्यासाठीच गेले तर एकाने फायटरने मला तोंडावर मारले. डोळ्याजवळ, गालावर, जखम झाली. दातही तुटले. पाठीवर बांबू, लाकडाने मारले. महिलांनाही मारले. रात्री  रुग्णालयात दाखल झालो. भारद्वाज हे नारायणगावला गेले. 
- देवानंद मोरे, गंभीर जखमी कलावंत

हा लाेककलेवर हल्ला


आम्ही महिलांना साेडवायला गेलाे असता त्यांनी मग माझ्यासह आमच्याच माणसांना जबर मारहाण केली. काठ्यांनी, फायटरने मारामारी केली. हे गावातीलच चांगल्या घरातील लाेकं आहेत. गावातील अनेकजण त्यांची नावं सांगायलाही घाबरत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, मिटवून घ्या. पण, हा अत्याचार आम्ही का सहन करायचा. ब्लेडने कपडे फाडले, पाेलिसांत तक्रार केली तर तमाशा जाळून टाकू अशी धमकी दिली. हा आमच्यावर नाही तर हा लाेककलेवर हल्ला झाला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. 
- आविष्कार मुळे, तमाशा मालक