आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत नाशिक येथील १२ वर्षांच्या आरव मंत्री व त्याचे वडील शिवलाल मंत्री यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमंजारोच्या गिलमन्स पॉइंटवर भारताचा तिरंगा फडकवून इतिहास रचला. गुरुवारी दि. (दि.७)नोव्हेंबर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता या दोघांनी किलीमंजारो गिलमन्स पॉइंटवर पाऊल ठेवले.
आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्रसपाटीपासून १९,३४१ फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी हे शिखर सर करून त्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेले बाल गिर्यारोहक आरव मंत्री व त्याचे वडील शिवलाल मंत्री दोघांनी हे शिखर सर केले आहे. शून्याच्या खाली तापमान, घोंगावत वाहणारे वारे, उभी चढण असे आव्हानात्मक वातावरणाला ताेंड देत पूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी २ नोव्हेंबर रोजी सुरुवात केली होती. आरव हा इयत्ता सातवीमध्ये आहे. सध्या वातावरणात झालेल्या मोठ्या बदलामुळे व वादळामुळे दररोज दुपारनंतर किलीमंजारो शिखरावर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टी होत आहे. सकाळी ऊन व दुपारनंतर वादळ असे भीती निर्माण करणारे वातावरण असून या सर्वाला भेदून पितापुत्राने हा पराक्रम केला.
कुुटुंबासाठी अभिमानास्पद
आफ्रिकेतील हे शिखर सर करणे माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुलगा आरवचा खूप अभिमान वाटतो. अत्यंत वाईट व बदलत्या वातावरणात आम्ही पोहोचू शकलो याचा अभिमान आहे - शिवलाल मंत्री,गिर्यारोहक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.