आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नाशिकमध्ये जंगी मिरवणूक: पालक मंत्री गिरीश महाजनांसह आयुक्त तुकाराम मुंडेंनी धरला ठेका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्य आणि देशासह सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू असताना नाशकातही जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरासह नाशिकच्या जगप्रसिद्ध ढोल पथकांनी माहोल केला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर रंजना भानसी यांनीही उपस्थिती लावली. तर गिरीश महाजनांसह आयुक्त तुकाराम मुंडेंनी नाशिक ढोलच्या तालावर ठेका धरला. दरम्यान, मिरवणूकीच्या कार्यक्रमाला झालेल्या विलंबाने कार्यकर्ते काहीसे नाराजही दिसून आले. 


पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर रंजना भानसी नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाऊण तास उशिरा मिरवणुकीचा प्रारंभ करण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली. पोलिस आयुक्तांकडून सकाळी 11 वाजता मिरवणुकीची वेळ गणेश महामंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार सर्व मंडळांनी मध्यरात्रीपर्यंत जागून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तयारी पूर्ण केली. अकरा वाजता 21 गणेशोत्सव मंडळ झाली होती. मात्र महापौर पालक मंत्री येत नसल्याने मिरवणुकीचा वाढवायचा कसा असा पेच पोलिस प्रशासन व गणेश महामंडळापुढे निर्माण झाला. कार्यकर्त्यांच्या घोषणा पाहता पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी मध्यस्थी करत गजानन नाना शेलार व महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांची समजूत काढून शांत राहण्याचे आवाहन केले.

 

बातम्या आणखी आहेत...