आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचा जवान काश्मिरात शहीद, 15 वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात होते कार्यरत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : आडगाव येथील जवान अप्पासाहेब मधुकर मते यांचा काश्मीरमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. ते सीमा सुरक्षा दलात हवालदार पदावर कार्यरत होते. गेल्या १५ वर्षांपासून ते सीमा सुरक्षा दलात सेवा बजावत होते. गुरुवारी (दि. ९) त्यांचे पार्थिव नाशिकला येणार आहे. आडगाव मेडिकल फाटा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

आडगाव येथे त्यांची आई म्हाळसाबाई, भाऊ भगीरथ, पत्नी मनीषा व मुलगा प्रतीक (११) असे कुटुंबीय वास्तव्यास आहे. शालेय जीवनापासून त्यांना देशसेवेची आवड होती. त्यांनी कराटेचे प्रशिक्षण घेत ब्लॅक बेल्ट मिळवला होता. २००५ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले. १५ वर्षांच्या सेवेत त्यांनी आसाम, सिमला, लखनऊ, नवगड, नेपाळ सीमा येथे सेवा बजावली. लखनऊ येथून त्यांची श्रीनगरमध्ये बदली झाली होती. वातावरणातील बदलाने त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता.

बातम्या आणखी आहेत...