Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | nashik mahant pujari arrest in dubai

नाशिकच्या महंतांना दुबईत अटक

विशेष प्रतिनिधी | Update - Mar 12, 2019, 02:04 PM IST

दुबईस्थित मिलिंद शहा यांच्या तक्रारीनंतर येथील महंत सुधीर पुजारी यांना ७ मार्च रोजी भारतात परतताना दुबई पोलिसांनी विमानत

  • nashik mahant pujari arrest in dubai

    नाशिक - दुबईस्थित मिलिंद शहा यांच्या तक्रारीनंतर येथील महंत सुधीर पुजारी यांना ७ मार्च रोजी भारतात परतताना दुबई पोलिसांनी विमानतळावर अटक केली. ४० दिवसांपासून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.


    भारतीय दूतावासाच्या मध्यस्थीनंतर त्यांची २ तासांत जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी पासपोर्ट नसल्याने ते तेथे एका मित्राच्या आश्रयाला असल्याचे कळते. पैशाच्या वादातून ही अटक झाल्याचे समजते. भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयास दोन पत्रे लिहिली आहेत. पुजारी यांनी २०१८ मध्ये दुबईत अल बुम मरीन लॉजिस्टिक्स, सहारा व्हिजन इन्व्हेस्टमेंट व नाझ जनरल ट्रेडिंग या कंपन्यांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. त्यासाठी दुबईला त्यांचे नियमित जाणे होत होते. २३ जानेवारीस हा प्रकार घडला.


    शहाने अडकवले, भारत सरकारने सोडवावे : पुजारी
    मंदिरासाठी दुबईत २० एकर जागा देणार असल्याचे मिलिंद शहाने सांगितले. २४ जानेवारीला दुबईत गेल्यावर माझा पासपोर्ट काढून घेतला. ७ मार्चला परतताना पोलिसांनी अटक करून २ तासांत सोडले. शहांनी अरेबिकमधील खोट्या कागदपत्रांवर माझ्या सह्या घेतल्या. भारत सरकारने लक्ष घातल्याने जामिन मिळाला. परंंतु, पासपोर्ट नसल्याने अडचणीत आहे. टुरिस्ट व्हिसाही संपला असून पैसेही संपले आहेत, असे महंंत सुधीर पुजारी यांनी सांगितले.

Trending