आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा ८००० पार; किरकोळ विक्रीत गाठणार शंभरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - यंदा जिल्ह्यात ६८ हजार २२६ हेक्टरवर लाल कांद्याची लागवड झाली होती. मात्र, अवकाळी पावसाने ५४ हजार ४०८ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाल्याने फक्त १३ हजार ८१८ हेक्टरवर कांदा शिल्लक अाहे.  दरवेळी दसऱ्यापासून बाजारात येणारा हा कांदा यंदा डिसेंबरच्या मध्यापर्यंत बाजारात येणार असल्याने तूर्तास आवक मोठ्या प्रमाणात घटली असून  गुरुवारी (ता.२१) देवळा बाजार समितीत उन्हाळ कांद्याला विक्रमी ८ हजार भाव मिळाला. जिल्ह्यातील इतर १० बाजार समित्यांतही साडेसहा ते साडेसात हजारापर्यंत विक्रमी भाव होते.आतापर्यंत नोव्हेंबरअखेर आणि डिसेंबरच्या पहिल्या महिन्यात लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात राहत असल्याने दर पडत असल्याने शेतकऱ्यांवर आंदोलनाची  वेळ येत होती. यंदा मात्र अवकाळी पावसाने सारे चित्रच बदलून टाकले आहे.कांदा भारतात दाखल होण्यास लागणार १० दिवस

केंद्र सरकारने ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून तसेच कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून १ लाख २० हजार मेट्रिक टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या चीन आणि इजिप्तमध्येच कांदा असल्याने या दोन्ही देशांमधून कांदा भारतात येण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागतात. त्यामुळे या दोन्ही देशांतील कांदा दुबई येथे विक्रीला येतो, दुबईवरून भारतात कांदा येण्यासाठी ५ दिवस लागतात. दुबई मार्गे कांदा भारतात आला तरी तो बाजारात येण्यासाठी किमान १० दिवस लागण्याची शक्यता आहे.किरकोळ बाजारात ८० रुपये :

सध्या  किरकोळ बाजारात कांदा ८०  रुपये किलो असला तरी येत्या काही दिवसांत तो शंभरी गाठण्याची चिन्हे आहेत.


> यापूर्वी २२ अॉगस्ट २०१५ ला येवल्यात ६५०० उच्चांकी भाव 


> जिल्ह्यातील इतर १० बाजार समित्यांतही साडेसहा ते साडेसात हजारांपर्यंत भावआयात केलेला कांदा राहणार ५० रुपये किलो

केंद्र सरकारने ग्राहकांसाठी परदेशातून कांदा आयात केला तरी त्याचा खरेदी दर, वाहतूक खर्च, पोर्टवरून बाजारात येईपर्यंत कांदा हा ५० रुपये प्रतिकिलो होईल. त्यामुळे तो ग्राहकांना ५५ रुपये किलो दराने खरेदी करावा लागेल, असे कांदा आयातदार आणि निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...