Fire Accident / नाशकातील पारिझाद परिसरात इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे 30 बंब घटनास्थळी

नाशिकः आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे 25 ते 30 बंब घटनास्थळी

Sep 07,2019 01:52:00 PM IST

नाशिक - शहरातील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारिझाद नगरमध्ये एका इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. कारडा कंस्ट्रक्शनच्या इमारतीला सकाळी सव्वा 10 वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 25 ते 30 बंब घटनास्थळी पोहोचले. त्यातच अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लावला असा आरोप देखील केला जात आहे. या दुर्घटनेत अद्याप कुठल्याही जीवित हानीचे वृत्त नाही.


कारडा कंस्ट्रक्शनची इमारत आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. आग लागलेल्या इमारतीमध्ये कोचिंग क्लासेस सुद्धा आहेत. सोबतच शेजारी टायर आणि इलेक्ट्रॉनिकचे दुकान देखील आहेत. आग लावली त्याचवेळी इमारतीमधील लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. कारडा कंस्ट्रक्शनचे मालक नरेश कारडा यांनी अग्निशमन दलावर उशीरा पोहोचल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आग लागताच फायर ब्रिगेडला घटनेची माहिती देण्यात आली होती. परंतु, अग्निशन दल उशीरा पोहोचल्याने आग सर्वत्र पसरली आणि रौद्र रूप धारण केले. आगीच्या कारणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

X