Maharashtra Election / नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सपत्नीक घेतली 'दिव्यमराठी' मतदान जागृती शपथ


'दिव्य मराठी'चा पुढाकार : बलशाली महाराष्ट्रासाठी गणरायांच्या साक्षीने करू मतदानाची प्रतिज्ञा

प्रतिनिधी

Sep 02,2019 05:31:19 PM IST

नाशिक- यंदा गणेशोत्सवानंतर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका सर्वाधिक औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे गणेशोत्सवात राजकीय फड रंगणार यात शंका नाही. मात्र, ज्या मतदारांच्या बळावर या निवडणुका होतात त्यांनीही सूज्ञ नागरिक म्हणून आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. यासाठी 'दिव्य मराठी'ने 'मतदानाची प्रतिज्ञा' करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सपत्नीक दिव्य मराठी मतदान जागृतीची शपथ घेतली.

विश्वास नांगरे पाटील यांनी सपत्नीक दिव्य मराठी मतदान जागृतीची शपथ घेताना

दिव्य मराठी प्रतिज्ञा
"भारत माझा देश आहे. माझ्यासारख्या बांधवांमुळे या देशात लोकशाही आहे. हा देश कोणत्याही नेत्याचा नाही. तो तुमचा आणि माझा आहे. या देशाची अंतिम सत्ता जनतेची आहे. मी मतदार असल्याचा मला अभिमान आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हा हक्क मी बजावणार आहे. मी कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा नाही. गणरायांच्या साक्षीने आम्ही प्रतिज्ञा करतो की या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारच. त्यातच माझे आणि माझ्या देशाचे सौख्य सामावलेले आहे."
जय हिंद, जय महाराष्ट्र.

X
COMMENT