आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एटीएम फोडले, दोन दिवसांत 44 लाखांची लूट, एटीएम फोडणारी टोळी सक्रीय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात सलग दुसऱ्या दिवशी एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. येथील मखमलाबाद चौकातून चोरट्यांनी एटीएम फोडून तब्बल 31 लाख रुपयांची लूट केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, 48 तासांतील ही सलग दुसरी घटना आहे. यापूर्वी बुधवारी चोरट्यांनी शहरातील दुसऱ्या एका ठिकाणी एटीएम फोडून 13 लाख रुपये लुटले. त्यामुळे, शहरात एटीएम फोडणाऱ्यांची टोळीच फिरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 

बुधवारीच चोरले 13 लाख
तत्पूर्वी बुधवारी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मिलिंद काशीनाथ नेहे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात संशयिताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जेलरोड मार्गावरील शिवाजीनगर परिसरात असलेल्या स्टेट बँक आँफ इंडियाच्या एटीएममध्ये दोन मशीनपैकी एक मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सह्यायाने तपास सुरू केला असून दरोड्यासाठी पाच ते सहा संशयित इनोव्हातून आल्याचे दिसत आहे. यामध्ये दोघा संशयितांनी एटीएममध्ये जाऊन सीसीटीव्हीची वायर कापल्याचे दिसत असून त्यानंतर रेकाँर्डिंग झालेले नाही.

आंतरराज्य टोळीवर संशय
एटीएमची चोरी ही माहितीगार संशयितांनी केली असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. लुटीमागे आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा अंदाज असल्याने पोलिसांनी सहा पथके वेगवेगळ्या भागात रवाना केले आहेत. संशयितांना पकडण्यासाठी जिल्हयातील सर्व टोलनाक्यांवरील, महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...