आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये सात मिनिटांत एटीएम फोडून १३ लाखांची राेकड लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकच्या जेलरोडवर शिवाजीनगर परिसरातील व्यापारी बँकेसमोर असलेल्या स्टेट बँक आँफ इंडियाचे  एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून मशीनमधील  १३ लाख ३० हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी अवघ्या सात मिनिटांमध्ये लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे तीन वाजता घडली.  बँकाचे एटीएमच्या सुरक्षेकडे पुन्हा दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. 

नाशिकरोड पोलिस ठाण्यात मिलिंद काशीनाथ नेहे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात संशयिताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल आहे. जेलरोड मार्गावरील शिवाजीनगर परिसरात असलेल्या स्टेट बँक आँफ इंडियाच्या  एटीएममध्ये दोन मशीनपैकी  एक मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सह्यायाने तपास सुरू केला असून दरोड्यासाठी पाच ते सहा संशयित इनोव्हातून आल्याचे दिसत आहे. यामध्ये दोघा संशयितांनी एटीएममध्ये जाऊन सीसीटीव्हीची वायर कापल्याचे दिसत असून त्यानंतर रेकाँर्डिंग झालेले नाही. 

आंतरराज्य टोळीवर संशय
एटीएमची चोरी ही माहितीगार संशयितांनी केली असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. लुटीमागे आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा अंदाज असल्याने पोलिसांनी सहा पथके वेगवेगळ्या भागात रवाना केले आहेत. संशयितांना पकडण्यासाठी जिल्हयातील सर्व टोलनाक्यांवरील, महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...