आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात नाशिक अव्वल, ९९१ प्रकल्पांची निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धा व प्रदर्शन भरवण्यात येते. यंदाच्या २०१८ व २०१९ या वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातील तब्बल ९९१ उपकरणांची निवड झाली असून आहेत. केंद्र सरकारतर्फे या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रकल्प विकसित करण्यासाठी थेट अनुदानही दिले जाणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी प्राथमिक स्तरावरील ही निवड चाचणी असते. राज्यभरात सर्वाधिक प्रकल्पांची निवड नाशिकमध्ये झाली आहे.
 
राज्य सरकारच्या www.inspire.award.in.या वेबसाइटवर नावनोंदणी केल्यानंतर त्यातील उत्कृष्ट प्रोजेक्ट निवडले जातात. त्यांना जिल्हा स्तरावर प्रदर्शनात सादरीकरणाची संधी दिली जाते. यावर्षी राज्यातून निवडलेल्या विविध प्रोजेक्टपैकी नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्पांची निवड झाली आहे. तब्बल ९९१ विद्यार्थ्यांच्या विज्ञान आधारित प्रकल्पांची निवड झाली असून यातील निवडपात्र प्रकल्प पुढील वर्षी राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभागी होतील. इन्स्पायर अॅवॉर्ड या राज्यस्तरीय प्रदर्शनाकरिता यंदा नाशिकच्या २४ प्रकल्पांची निवड झाली आहे. येत्या १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत जळगाव येथील सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित वसंतराव मोरे तंत्रनिकेतन महाविद्यालयात हे राज्यस्तरीय प्रदर्शन होईल. यामध्ये शैक्षणिक वर्ष २०१७ व २०१८ मध्ये जिल्हास्तरीय प्रदर्शनातून निवड झालेले २४ प्रकल्प सहभागी होणार अाहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...