आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकची प्रसिद्ध वाइन अन् नांदूर-मधमेश्वर अभयारण्य लंडनच्या 'वर्ल्ड ट्रेड मार्ट' प्रदर्शनात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात मंगळवारपासून (दि. ५) सुरू झालेल्या 'वर्ल्ड ट्रेड मार्ट' प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली. या प्रदर्शनात नाशिकनेही बाजी मारली असून अॅग्रो टुरिझममध्ये नाशिकची वाइन, अभयारण्यात नांदूर-मधमेश्वरचे पक्षी अभयारण्य, एेतिहासिक वारशात बौद्ध लेणी, चामर लेणी, रामशेज किल्ला याची माहिती या जागतिक स्तरावरील प्रदर्शनात मांडली. जगभरातील १०३ देशांतून आलेल्या पर्यटकांनीही महाराष्ट्रासह नाशिकच्या पर्यटनामध्ये रस दाखवला आहे. लंडनच्या या प्रदर्शनात 'महाराष्ट्र पर्यटन'च्या स्टॉल उभारण्यात आला आहे. त्यात गडकिल्ले, अजिंठा, वेरूळ, एलिफंटा अन् नाशिकची चामर लेणी, बौद्ध लेणी आदी विविध ऐतिहासिक गुंफांचे वैभव, व्याघ्र पर्यटन, समुद्रकिनारे, जंगले, कास पठारसारखी जागतिक वारसास्थळे, तिर्थक्षेत्रे, लोणावळा, महाबळेश्वर, चिखलदरा, माथेरान आदी थंड हवेची ठिकाणे अशा विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रदर्शित करण्यात आली.


राज्यासह नाशिक पर्यटनासाठी पर्यटकांना आग्रह
या प्रदर्शनात जगभरातील बहुतांश देश सहभागी आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभागानेही सहभागी होत ताडोबा अभयारण्यापासून विविध समुद्रकिनारे, गुंफा, किल्ले, जंगले आदींची माहिती जगभरातील पर्यटकांना देत अाहोत. नाशिकच्या वाइनसह नांदूर-मधमेश्वरच्या पक्षी अभयारण्य, लेणी, किल्ल्यांची माहिती पर्यटकांना देत आहोत. - रामदास खेडकर, पर्यटन उपसंचालक

बातम्या आणखी आहेत...