आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अच्छे दिन : पाकिस्तानातील कांदा संपत आल्याने परदेशातून नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव - उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही भावाचा फटका बसत असतानाच आता पाकिस्तानातील कांदा संपत आल्याने आपल्या भागातील कांद्याला चांगल्या प्रमाणात मागणी असल्याने कांद्याच्या भावात अल्पशी सुधारणा होत असल्याचे पहायला मिळत आहे. आखाती देशांमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चांगल्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सध्या बाजारात येणाऱ्या लाल कांद्याला चांगल्या मालाला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धोका दिला असल्याने लाल कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे.


सरत्या वर्षात पावसाने पाठ दाखविल्यामुळे लाल कांदा पाहिजे तसा तयार झालेला नाही. पुरेशी वाढ झालेली नसल्याने लाल कांद्यालादेखील उन्हाळ कांद्यापाठोपाठ भावात फटका बसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. असे असतानाच भारताबरोबरच कांदा निर्यात करणारा पाकिस्तान हा प्रमुख प्रतिस्पर्धी देश आहे. मात्र, सध्या पाकिस्तानातील कांदा संपत आल्यामुळे भारतातील कांद्याला चांगली मागणी वाढली आहे.


लाल कांद्याला आखाती देशातील दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, कतार याबरोबरच श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांतून चांगली मागणी सुरू आहे. केंद्र सरकारने निर्यातीला चालना मिळावी या हेतूने निर्यातीच्या अनुदानात पाच टक्क्यांवरून वाढ करून ती आता दहा टक्के केल्याने त्याचा फायदाही निर्यातीला होणार असून शेतकऱ्यांना थोडीफार का होईना भाववाढीची मदत यानिमित्ताने मिळणार आहे.


इतर देशांतून मागणी वाढत असतानाच दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांत गुजरातमधील कांद्याला मागणी होती, ती मागणी आता घटली असून त्याचा फायदा ही महाराष्ट्रातील कांद्याला मिळत आहे. त्यामुळे या राज्यातही आपला कांदा चांगल्या प्रमाणात जात असून याबरोबरच पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातही चांगल्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढली आहे.

 

उन्हाळ कांद्याला कवडीमोल भाव असल्याने आवक अतिशय कमी.....

नाशिक जिल्हा भारत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक झालेली असल्याने गेली आठ महिन्यांपासून हा कांदा बाजार समित्यांमध्ये विक्रीला येत आहे आज उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये सरासरी इतका अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बाजार समितीत उन्हाळ कांदा विक्रीस आणण्यास वाहतूक खर्चही परवडत नसल्याने शेतकरी तो विकण्यापेक्षा फेकलेला बारा असा विचार करत आहेत. मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा शिल्लक असल्याने कमी भाव मिळत असल्यामुळे तो फेकून देण्याची वेळ यांना शेतकऱ्यांवर आलेली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...