आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नसिरुद्दीन शाह, फरान अख्तर आणि स्वरा भास्कर स्लीपर सेल, योगेश सोमण यांचे वादग्रस्त वक्तव्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राहुल गांधीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "अभिनेते नसिरुद्दीन शाह, फरान अख्तर आणि स्वरा भास्कर स्लीपर सेल आहेत" असे वादग्रस्त वक्तव्य सोमण यांनी केले आहे. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 'सीएए देश की जरुरत, जेएनयू का सच' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी योगश सोमण बोलत होते. जेएनयू सारख्या संस्थांमध्ये विष पेरून पिढ्या तयार केल्या जातात

योगश सोमण म्हणाले की, "देशात इथे कोणीही यावे आणि कसेही राहावे. हिंदुस्तान धर्मशाळा आहे का? मतांसाठी काही राजकीय पक्ष घरदार सेट करून देत आहेत. जेएनयू ही वर्षानुवर्षांची विषवल्ली आहे. अशा अनेक शिक्षण संस्था देशात आहेत. अशा संस्थांमध्ये विष पेरून पिढ्या तयार केल्या जातात. अभिनेते नसिरुद्दीन शहा, फरान अख्तर आणि स्वरा भास्कर हे तिघेही स्लीपर सेल आहेत. नसिरुद्दीन शहा यांना मुसलमान असल्याने या देशात राहण्याची भीती वाटते. म्हणजे ते भारतात 2014 नंतर आले का?" असा सवालही सोमण यांनी यावेळी केला.


 

भाजपवर कौतुकाचा वर्षाव


योगेश सोमण यांनी आपल्या भाषणातून भाजपचे कौतुक केले. भाजपने देशहितासाठी अनेक निर्णय घेतले. विरोधकांनी सर्जिकल स्ट्राईक आणि जीएसटीची खिल्ली उडवली. परंतु त्यानंतरही 2019 च्या निवडणुकीत भाजप पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळवत बहुमताने सत्तेत आले. मध्यंतरी अनेकांनी पुरस्कार वापसी सुरू केली होती. मात्र या पुरस्कार वापसीजा बोजा उडाल्याने पुरस्कार वापसकर्ते डोक्याला हात लावून बसले आहेत. पुरस्कार वापसी करणाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना हाताशी धरून विरोध सुरू आहे आणि त्याला बाहेरून फंड मिळत असल्याचा आरोप देखील सोमण यांनी यावेळी केला. 

बातम्या आणखी आहेत...