• Home
  • Bollywood
  • Hollywood news
  • Natalie Portman annoyed due to no nomination to female directors in Oscar, apposed by wearing a dress which have names of female directors

ऑस्कर 2020 / महिला दिग्दर्शकांना नॉमिनेशन न मिळाल्यामुळे नताली पोर्टमन नाराज, ड्रेसवर डायरेक्टर्सची नावे लिहून केला रेड कार्पेट वॉक

ऑस्कर इतिहासमध्ये आतापर्यंत केवळ पाच वेळा फीमेल डायरेक्टर्सला नॉमिनेशन मिळाले आहे

2009 चा चित्रपट ‘द हर्ट लॉकर’ साठी अवॉर्ड जिंकणारी कॅथरीन बिगलो एकमेव महिला दिग्दर्शक

दिव्य मराठी वेब टीम

Feb 10,2020 03:38:00 PM IST

हॉलिवूड डेस्क : 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स सेरेमनीमध्ये चित्रपट अचीव्हमेंट्ससाठी सेलेब्सचा सम्मान केला गेला. कार्यक्रमध्ये सामील झालेली अभिनेत्री नताली पोर्टमनने अनोख्या स्टाईलमध्ये अकॅडमीचा विरोध केला. रेड कार्पेट वॉक करण्यासाठी नताली महिला दिसघर्षकांची नावे लिहिलेला ड्रेस घालून पोहोचली. विशेष गोष्ट ही आहे की, ड्रेसवर त्या महिलांची नावे लिहिलेली होती, ज्यांना यावेळी नॉमिनेशन मिळाले नाही. चित्रपट ‘पैरासाइट’ साठी बॉन्ग जून हो याला बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे.


नतालीला 2011 मध्ये ‘ब्लॅक स्वान’ चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होता. यापूर्वी ती 2017 आणि 2005 मध्ये या अवॉर्डसाठी नॉमिनेट झाली आहे. अवॉर्ड सेरेमनीमध्ये प्रेझेंटर म्हणून पोहोचलेल्या नतालीने आपल्या ड्रेसवर महिला डायरेक्टर्सची नावे लिहून विरोध दर्शविला.


ऑस्कर सेरेमनीमध्ये ही सलग दुसरी वेळ आहे जेव्हा महिला डायरेक्टर्सला नॉमिनेशन मिळाले नाही. यामुळे अवॉर्ड्सचा अनेक सेलिब्रिटींनी विरोध केला. सांगितले जात आहे की, ‘लिटिल वुमन’ साठी ग्रेटा गेर्विग, ‘द फेअरवेल’ साठी लुलु वॉन्ग, ‘अ ब्यूटिफुल डे इन नेबरहुड’ साठी मॅरियल हॅलरला नॉमिनेशन मिळू शकते. मात्र ग्रेटा गेर्विगचा चित्रपट ‘लिटिल वुमन’ ला 6 कॅटॅगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले होते.


92 वर्षात केवळ पाच महिला डायरेक्टर्स झाल्या नॉमिनेट...


यावेळी बेस्ट डायरेक्टर कॅटॅगरीमध्ये द आयरिशमॅन (मार्टिन स्कोरसेस), जोकर (टॉड फिलिप्स), 1917 (सॅम मेंडेस), वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड (क्विंटन टॅरेंटीनो) आणि पॅरासाइट (बॉन्ग जून हो) ला नॉमिनेशन मिळाले होते. विशेष गोष्ट ही आहे की, अकॅडमीच्या 92 वर्षांच्या इतिहासात केवळ 5 महिला दिग्दर्शकांना नॉमिनेशन मिळाले आहे.

  • लीना वर्मुलर - सेव्हन ब्यूटीज (1976)
  • जेन कॅम्पियन - द पियानो (1993)
  • सोफिया कोपोला- लॉस्ट इन ट्रांसलेशन (2003)
  • कॅथरीन बिगलो - द हर्ट लॉकर (2009)
  • ग्रेटा गेर्विग- लेडी बर्ड (2017)
X