आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅरीबॅग हिसकावण्यासाठी गुंडांनी महिलेला 20 फुट फरफटत नेले, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर(पंजाब) - येथे हातापायीची घटना समोर आली आहे. दोन दुचाकीस्वार चोरटे महिलेच्या हातातील कॅरीबॅग हिसकावून घेत होते. पण महिलेने हिम्मत दाखवत कॅरीबॅग सोडली नाही. अखेर दुचाकीस्वारांनी महिलेलाच 20 फूट फरफटत नेले. यानंतर महिलेच्या हातातील कॅरीबॅग सुटली आणि चोरटे ती बॅग घेऊन फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

सीसीटीव्हीत कैद झाली घटना

सदरील घटना शुक्रवारी दुपारी शहरातील गोपाल नगरता दुपारी 12 वाजून 54 मिनिटांना घडली. वीना शर्माने सांगितले की, ती घराबाहेर उभी होती. इतक्यात तेथे दोन दुचाकीस्वारांनी एकदम तिच्या समोर दुचाकी उभी केली. मागे बसलेल्या एकाने तिची कॅरीबॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. कॅरीबॅग न सोडल्यामुळे आरोपी महिलेलाच सोबतच फरफटत नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 


सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना मिळाले अनेक पुरावे
पोलिसांना याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला आहे. पोलिसांना लुट करणाऱ्यांविरोधात बरेच पुरावे मिळाल्याची माहिती आहे. दरम्यामन तपास अधिकारी सुखविंदर सिंह यांनी सांगितले की, सीसीटीव्हीत दिसणारे चेहऱ्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांना पकडण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...