आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोरोना’मुळे सव्वाचारशे वर्षांची परंपरा खंडित, पैठणचा नाथषष्ठी उत्सव रद्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टुरिंग टॉकीज, तात्पुरती दुकाने, रहाटपाळण्यांना परवानगी नाकारली
  • दिंड्या मात्र दाखल, धार्मिक विधी होणार

पैठण - काेराेना व्हायरसच्या शक्यतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पैठण येथील नाथषष्ठी साेहळा रद्द करण्याचे आदेश साेमवारी बजावले आहेत. मात्र, हा आदेश जारी हाेण्यापूर्वीच लाखाे वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून बुधवारपासूनच पैठणमध्ये दाखल हाेण्यास सुरुवात झाली आहे. तथापि, पैठणमध्ये हाेणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने तात्पुरती दुकाने, टुरिंग टाॅकीज, रहाटपाळणे व इतर मनाेरंजनाच्या गाळ्यांनाच परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पैठणमध्ये येणारे भाविक जास्त दिवस तेथे रमणार नाहीत, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
नाथषष्ठी सोहळा जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्याने कोणत्याही आगारातून पैठणसाठी जादा बसेस सोडल्या जाणार नाहीत.  पैठण न. .प. तर्फे यात्रा मैदानावर तात्पुरती दुकाने, रहाटपाळणे, टुरिंग टाॅकीज, तमाशा फड व जेथे गर्दी होईल, अशा ठिकाणी जागाच उपलब्ध करून दिली जाणार नाही तसेच दुकानांना परवानगीच दिली जाणार नाही. परंतु  वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, विद्युत व्यवस्था व गावाबाहेर लवकरात लवकर सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाक्यानाक्यांवर आरोग्य तपासणी पथके व उपचार केंदे स्थापित केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले.

१६ तासांत यात्रा रद्दचे आदेश : नाथषष्ठी सोहळ्यासंदर्भात मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित प्रशासनाच्या बैठकीत यात्रा होणार, असे सांगण्यात आले होते. मात्र १६ तासांतच जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचे आदेश काढले. यावर तहसीलदार शेळके म्हणाले की, या दरम्यान महाराष्ट्रात कोरोनोचे रुग्ण आढल्याने यात्रा रद्द केली गेली.दर्शन घेऊन माघारी परता

नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून पायी  दिंड्या निघाल्या आहेत. त्या शहरात दाखल होतील. तेव्हा नगर परिषदेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जाईल.  धरणातून पाणी सोडले जाणार असून गोदावरी पत्रात  राहुट्या व फड वारकऱ्यांनी टाकू नये. यात्रेकरूंनी दर्शन घेऊन तत्काळ माघारी परतावे.
-सुरज लोळगे,  नगराध्यक्ष पैठणधार्मिक सोहळा होणार 

नाथषष्ठीची शेकडो वर्षाची परंपरा आहे, वारकरी दाखल होत असताना हा निर्णय घेतला गेला मात्र जे वारकरी येतील त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावेत, धार्मिक सोहळा तर होणार आहेच
-योगीराज महाराज, गोसावी नाथ वंशज

 

बातम्या आणखी आहेत...