आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Dinesh Kumar A National Boxer Now Sells Ice Creams For Living As Well As To Repay Loan In Bhiwani Haryana

देशाला 17 सुवर्णपदक मिळवून देणारा बॉक्सर रस्त्यावर विकतोय कुल्फी. सोशल मिडीयावर फोटोज व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवानी (हरियाणा) - एकेकाळी बॉक्सिंगमध्ये देशाचे नाव उंचावणारा राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर दिनेश कुमार सध्या भिवानी शहरातील रस्त्यांवर कुल्फी विकतांना दिसत आहे. त्याचे काही फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्याच्या करियरमध्ये त्याने 17 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कास्य पदक जिंकल्याचा दावा बॉक्सर दिनेश कुमारने केला आहे. पण आज, दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी आणि वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी भिवानीमध्ये कुल्फी विकत आहे.

>> वृत्तसंस्था ANIच्या अहवालानुसार, मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळावी यासाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतले असल्याचे दिनेशने सांगितले आहे. आपल्या वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी त्यांच्याबरोबर आइस्क्रीम विकत आहे. मी मागील आणि सध्याच्या सरकारकडून मदत मागितली असता दोन्ही सरकारने माझी दखल घेतली नाही. तरी सरकारने मला नोकरी देऊन माझी मदत करावी अशी माझी इच्छा आहे.

 

>> ही भारतातील पहिलीच घटना नसून, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी विविध खेळांमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. परंतु आता लोक त्यांना विसरले असुन ते खेळाडू एकटेपणाचे आयुष्य जगत आहे.

>> यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात नरसिंगपूर जिल्ह्यातील दिव्यांग राष्ट्रीय अॅथलेटिक मनमोहनसिंग लोधी भोपाळच्या रस्त्यावर भीक मागताना दिसुन आले होते. त्यांनी असे म्हटले की, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मन की बात कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलेल्या दिव्यांग खेळाडूंना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासनाच्या एक वर्षानंतरही नोकरी न मिळाल्याने संबंधित मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...