आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश पुन्हा बेपत्ता, बऱ्हाणपूरच्या निवासी आश्रमशाळेतील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर - तालुक्यातील कोथळी येथील बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश भील हा दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील श्रीराम गुरुकुल निवासी आश्रमातून निघून गेला. ही घटना गुरुवारी पहाटे सव्वाचार वाजता उघडकीस आली आहे. यासंदर्भात शिकारपुरा पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. 


कोथळी येथील आशापुरी भागात झोपडीत राहत असलेला नीलेशला वडील रेवाराम भील रागावल्यामुळे रागाच्या भरात नीलेश हा लहान भाऊ गणपतला घेऊन १७ मे २०१७ रोजी घर सोडून निघून गेला होता. १७ आॅगस्ट २०१७ रोजी गणपतचा शोध कानपूर (उत्तर प्रदेश) येथे लागला होता. तर नीलेश बेपत्ताच होता. तो गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील स्नेहालयात सापडला होता. त्यानंतर नीलेशच्या पुनर्वसनासाठी जळगावच्या केशवस्मृती प्रतिष्ठानअंतर्गत समतोल प्रकल्प संस्थेने पुढाकार घेऊन त्याला शिक्षणासाठी बऱ्हाणपूर येथील श्रीराम गुरुकुल या निवासी आश्रमात इयत्ता आठवीच्या वर्गात प्रवेश दिला होता. मात्र, तो गुुरुवारी पहाटे आश्रम सोडून निघून गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो एक बॅग घेऊन पहाटे जाताना दिसून आला.

पहारेकऱ्याला चकवा देऊन तो बाहेर पडल्याचे सांगण्याात येत आहे. गुरुवारी दिवसभर त्याचा शोध घेतला पण तो आढळून आला नाही. यासंदर्भात नीलेशच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून, शिकारपुरा पोलिस ठाण्यात त्याच्या हरवल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती आश्रमाचे ट्रस्टी सुरेश पाटील यांनी दिव्य मराठीशी बोलतान दिली. दरम्यान, तो निघून गेल्यानंतर त्याच्या पालकांशी संपर्क करण्यात आला आहे. मात्र तो वारंवार का निघून जात आहे याचा शोध आता स्थानिक पोलिस करणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...