आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून गांधीतीर्थ येथे राष्ट्रीय शिबिर; तुषार गांधींची उपस्थिती; २० राज्यांचे प्रतिनिधी येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- देशाच्या सामाजिक, विकास आणि प्रगतीत युवाशक्तीचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. अशा युवावर्गात गांधीयन नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने गांधीतीर्थ येथे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान 'नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्प'चे अायाेजन करण्यात अाले आहे. महात्मा गांधी आणि कस्तुरबा अर्थात 'बा-बापू १५० व्या जयंती'वर्षाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाचे उद‌्घाटन २६ रोजी सकाळी ११ वाजता हाेईल. 


महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आयआयटी पवईचे चेअर प्रोफेसर डॉ. सुदर्शन आयंगार, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक सेवादास दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या उपस्थितीत उद‌्घाटन होणार आहे. या कॅम्पसाठी भारतातील २० राज्यातील तसेच नेपाळ असे दोन्ही मिळून सुमारे ६५ युवा-युवतींचा यात सहभाग आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनने आयोजित केेलेल्या 'नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्प'मध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यात अनुकूल जीवनशैली याबाबत सोनम वांगचूक उपस्थितांशी सुसंवाद साधतील. लडाखमधील एक अभियंता आणि शिक्षण सुधारक म्हणून त्यांचा लौकिक आहे. 'थ्री इडियट' चित्रपटात आमिर खानने त्यांची भूमिका साकारली आहे. 'गांधी प्रासंगिकता का मर्म' या विषयावर गांधी विचारवंत, लेखक डॉ. विश्वास पाटील, 'सत्य और अहिंसा के प्रकाश में खुद को जाने' - प्रो. एम. पी. मथाई, 'आज के संदर्भ में शाश्वत पर्यावरण का प्रारूप' याबाबत पर्यावरण व युवक विषयावर प्रभुत्व असलेले 'गतिमान संतुलन' या नियतकालिकाचे संपादक डॉ. दिलीप कुलकर्णी, 'गांधीवादी आर्थिक विचारधारा' याबद्दल आदिवासी जीवनशैलीचा अभ्यास करणाऱ्या प्रो. डॉ. निमिषा शुक्ल विचार मांडतील. 'सामाजिक सद‌्भावना' याविषयी समाजकारण आणि युवक या विषयाचे तज्ज्ञ जावेद आनंद मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय तुषार गांधी, डॉ. सुदर्शन य्यंगार, डॉ. जॉन चेल्लादुरई हे देखील युवा-युवतींशी सुसंवाद साधणार आहेत. 


युवक-युवतींचा सहभाग 
या कॅम्पसाठी भारतभरातील २० राज्यांसह नेपाळ असे मिळून ६५ युवक व युवतींचा सहभाग राहणार अाहे. या वेळी कॅम्पला उपस्थित मान्यवर या युवक-युवतींशी संवाद साधणार अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...