आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Film Award Winner Ayushmann Khurrana On Four Month Family Break, After Come Back Wants To Do Action Film

चार महिन्यांच्या फॅमिली ब्रेकवर गेला आयुष्मान खुराणा, परतल्यानंतर अ‍ॅक्शन फिल्म करण्याची आहे इच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार पदक व प्रमाणपत्र मिळाल्याच्या एक दिवसानंतर आयुष्मान खुराणाने लांब ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. आता तो आपल्या कुटुंबासमवेत फॅमिली व्हेकेशनवर जातोय. हा ब्रेक सुमारे चार महिन्यांचा असेल. महत्त्वाचे म्हणजे 2019 मध्ये त्याने 'ड्रीम गर्ल', 'आर्टिकल 15' आणि 'बाला'सारखे उत्कृष्ट चित्रपट केले.  'अंधाधुन'साठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. मिडडेला दिलेल्या मुलाखतीत आयुष्मान खुराणा म्हणाला- "मी माझ्या मुलांबरोबर उन्हाळ्याची सुटी गमावली होती. त्यामुळे आता मी चार महिन्यांच्या सुटीवर आहे. मी व्हेकेशनवर जात आहे आणि पुढचे चित्रपट साइन करण्यासाठी वाट पाहत आहे.' आयुष्मानला इतका काळ इंडस्ट्रीपासून दूर राहिल्याने मोठे चित्रपट हातून जाऊ शकतात असे विचारले असता तो म्हणाला , 'मी हा ब्रेक घेऊ शकतो कारण माझे 'गुलाबो सीताबो' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हे दोन चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. 2019 मध्ये मी खूप काम केले होते, कुटूंबाकडे दुर्लक्ष करून मला खूप वाईट वाटले. माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे आनंद घ्या असा आहे. आयुष्य जगणे आणि काहीतरी नवीन शोधणे हे आपल्या सिनेमातून प्रतिबिंबित होत असतं. याकाळाच मी उर्दू वाचणे आणि लिहायला शिकत आहे. मला कविता लिहायच्या असल्याने मला भाषेशी अधिक परिचित व्हायचे आहे.' एखाद्या शैलीत ओव्हरएक्सपोज झाल्याने तू काळजीत आहे का ? असा प्रश्न विचारला असता, आयुष्मान म्हणाला, "मी 2012 मध्ये विकी डोनरपासून सुरुवात केली होती, आणि आता आम्ही याला आयुष्मान जेनर म्हणतो. जेव्हा मी हे चित्रपट करत होतो तेव्हा मी जेनर बनवण्याचा प्रयत्न करत नव्हतो.  आता उत्तम चित्रपट देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मला यापासून वेगळे होण्याची आवश्यकता असू शकते, परंतु ऑफबीट चित्रपट मी जे करत आहे ते आहे. मी ही शैली मोडू शकत नाही. पण आता मी एका अ‍ॅक्शन फिल्मच्या शोधात आहे, परंतु अद्याप कोणताही विषय माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही."

बातम्या आणखी आहेत...