आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी परिषदेची 31वी बैठक: टीव्ही, कॅमेरे, पॉवर बँक, सिनेमा तिकीट, टायरसह ऑटो पार्ट स्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जीएसटी परिषदेने शनिवारी सर्वसामान्यांच्या उपयोगाच्या १७ वस्तू व ६ सेवांवरील जीएसटी दरांत कपातीचा निर्णय घेतला.  यामुळे ३२ इंचांपर्यंतचे  मॉनिटर व टीव्ही, सिनेमा तिकिटे, टायर, वाहनांचे काही सुटे भाग, लिथियम आयन बॅटरीच्या पाॅवर बँक, व्हिडिओ गेम कन्सोलसारख्या वस्तू स्वस्त होतील. परिरषदेने एकूण ७ वस्तूंना २८% श्रेणीबाहेर केले आहे. या श्रेणीत आता २८ वस्तू-सेवा उरल्या आहेत. नवीन दर १ जानेवारीपासून लागू होतील. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सांगितले की, या निर्णयामुळे ५,५०० कोटींचा महसूल घटेल. सततच्या कर कपातीमुळे २८% श्रेणीत मोजक्या वस्तू राहिल्या आहेत.  आता सर्वसामान्यांच्या वापराच्या वस्तूंपैकी काही ऑटो पार्ट््स व सिमेंटच २८% कराच्या श्रेणीत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ९९% वस्तू व सेवांना जीएसटीच्या २८% श्रेणीबाहेर केले जाईल. म्हणजे फक्त १% वस्तू त्यात असतील. शनिवारच्या निर्णयानंतरही एकूण ११०० वस्तू-सेवांपैकी सुमारे २.५% वस्तू या २८% जीएसटी श्रेणीत उरल्या आहेत.

 

ग्राहकांसाठी फायद्याच्या बाबी... 
या वस्तूंवरचा कर २८% वरून आला १८% वर

{३२ इंचांपर्यंत मॉनिटर व टीव्ही स्क्रीन.
{वाहनांची पुली, ट्रान्समिशन शाफ्ट्स, क्रँक्स आणि वाहनांचे गिअर बॉक्स.
{रिसोल वा जुने न्यूमेटिक रबर टायर. 
{लिथियम आयनच्या पॉवर बँका.
{डिजिटल फोटो-व्हिडिओ कॅमेरे
{व्हिडिओ गेम कन्सोल व इतर गेम.क्रीडासंबंधित काही इतर उपकरणे.


२८% वरून ५% {दिव्यांगांसाठी उपयोगी सुटे भाग आणि अॅक्सेसरीज.
१८% वरून १२% {मालवाहू वाहनांवरील थर्ड पार्टी विमा प्रीमियम.
१८% वरून ५% {मार्बलचा चुरा.
१२% वरून ५% {नैसर्गिक कॉर्क, चालण्याची काठी, फ्लाय अॅश ब्लॉक.
१२% वरून ०% {म्युझिक बुक.


या वस्तूंवर ५% जीएसटी होता, आता पूर्ण हटवला
{फ्रोझन, ब्रँडेड व कंटेनर बंद भाज्या. सल्फर डाय आॅक्साइड गॅसने संरक्षित केलेल्या तत्काळ वापराच्या भाज्या.
{बेसिक बचत खाते व जन-धन खात्यांतील व्यवहार.
{शैक्षणिक संस्था, पुनर्वसन केंद्रांच्या व्यावसायिकांच्या सेवा.

या सेवांत जीएसटीच्या दोन श्रेणी तयार केल्या
{१०० रु. वरील सिनेमा तिकिटावर कर २८% वरून १८%, तर १०० रु. पर्यंतच्या तिकिटावर १२% कराची आकारणी.
{धार्मिक यात्रेसाठीच्या विशेष विमान सेवांवर ५% जीएसटी. तो इकोनॉमी श्रेणीच्या सध्याच्या दराइतकाच असेल.

 

जेटली : सिमेंटला २८% श्रेणीबाहेर करण्याचे उद्दिष्ट
सिमेंटवर कर कपात केल्यास १३ हजार कोटींचा फटका बसेल. पुढे चालून जीएसटी महसुलात वाढ झाल्यानंतर सिमेंटला २८% कर श्रेणीतून बाहेर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

व्यापाऱ्यांना लाभ...

 

नवी रिटर्न फायलिंग सिस्टिम पुढील वर्षी १ जुलै २०१९ पासून
{नवी रिटर्न फायलिंग सिस्टिम १ एप्रिल २०१९ पासून प्रायोगिक तत्त्वावर लागू होईल. १ जुलै २०१९ पासून ती पूर्णपणे लागू होईल. 
{२०१७-१८ साठी रिटर्न फायलिंगची अंतिम मुदत ३० जून २०१९ पर्यंत.
{ई-कॉमर्स कंपन्यांना अॉक्टोबर ते डिसेंबरसाठी जीएसटीआर-८ फॉर्म ३१ जानेवारीपर्यंत जमा करता येईल.  
{जुलै-सप्टेेंबर २०१७ साठी ३१ मार्च २०१९ पर्यंत जीएसटीआर-१, ३ बी व जीएसटीआर-४ जमा केल्यास विलंब शुल्क लागणार नाही. 
{इनपुट क्रेडिट घटवल्यानंतर नेट टॅक्स देणीवरच व्याज लागेल.

बातम्या आणखी आहेत...