आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सुनावणी 4 डिसेंबरला: राहुल, सोनिया गांधींनी दाखल केली याचिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- सर्वाेच्च न्यायालय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. संबंधितांनी प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या नोटिसीच्या वैधतेला याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. न्या. ए. के. सिकरी व न्या. एस. अब्दुल नजीर यांचे पीठ यावर ४ डिसेंबरला सुनावणी करणार आहे.  


नॅशनल हेरॉल्ड व यंग इंडियातील व्यवहारप्रकरणी नव्याने कर आढावा घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाने राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे नेते ऑस्कर फर्नांडिस यांना नोटीस जारी केली होती. यावर्षी ३१ मार्चला प्राप्तिकर विभागाने ही नोटीस बजावली होती. यामध्ये २०११-१२ मध्ये कराचा नव्याने आढावा घेऊन संबंधित अवधीत नॅशनल हेरॉल्ड व यंग इंडियात झालेल्या आर्थिक देवाणघेवाण प्रकरणात कर न भरल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यंावर आहे.काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीने वकील पी. चिदंबरम, कपिल सिब्बल व अरविंद दातार यांनी सर्वाेच्च न्यायालयात हे केवळ शेअर हस्तांतराचे प्रकरण असल्याचा युक्तिवाद केला. त्याला उत्पन्न म्हटले जाऊ शकत नाही. त्यामुळे ही नोटीस अवैध आहे. या प्रकरणी न्यायालयाने प्राप्तिकर विभागाची नोटीस रद्द करावयास हवी. 

 

एजेएलच्या याचिकेवर १५ नोव्हेंबरला सुनावणी  
हेरॉल्ड हाऊस रिकामे करण्याच्या केंद्राच्या आदेशाविरुद्ध असोसिएटेड जर्नल्स लि.(एजेएल)च्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्याची आवश्यकता नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्या. सुनील गौड यांनी सांगितले की, आपण यावर १५ नोव्हेंबरला सुनावणी करू. एजेएल नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक आहेत. एजेएलने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या ३० ऑक्टोबरच्या आदेशाविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली. आदेशात एजेएलला हेरॉल्ड हाऊसला १५ नोव्हेंबरपर्यंत रिकामे करण्यास सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...