Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Off The Field | National Kho-Kho sport two boys get Janki award

महाराष्ट्राच्या युवांचा डबल धमाका; राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत पुण्याच्या वृषभला ‘वीर अभिमन्यू’ व रेश्मा राठोडला ‘जानकी’ पुरस्कार

क्रीडा प्रतिनिधी | Update - Dec 08, 2018, 09:25 AM IST

महाराष्ट्राचे पुरुष अाणि महिलांचे संघ विजेतेपदाचे मानकरी ठरले.

 • National Kho-Kho sport two boys get Janki award

  भाेपाळ- महाराष्ट्राच्या युवा संघांनी ३८ व्या ज्युनियर राष्ट्रीय खाे-खाे स्पर्धेत किताबाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्राचे पुरुष अाणि महिलांचे संघ विजेतेपदाचे मानकरी ठरले. याशिवाय वैयक्तिक पुरस्कारांमध्येही महाराष्ट्राच्याच खेळाडूंनी दबदबा निर्माण केला. या स्पर्धेत महाराष्ट्राची कर्णधार रेश्मा राठाेड नेत्रदीपक कामगिरीमुळे यंदाच्या स्पर्धेत चमकली. तिने नेतृत्वासह मैदानावरही अव्वल कामगिरी केली. तिला जानकी पुरस्काराने गाैरवण्यात अाले. कर्णधार वृषभ वाघला वीर अभिमन्यू पुरस्कार देण्यात अाला. यासह महाराष्ट्राच्या दाेन्ही संघांनी किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवले. गत वर्षीही हे संघ नॅशनल चॅम्पियनचे मानकरी ठरले हाेते.

  काेल्हापूरवर मात :

  कुमारांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या महाराष्ट्राने कोल्हापूरचा १२-११ असा एक डाव एक गुणाने सहज मात करून जेतेपद पटकावले.

  रेश्माच्या कामगिरीने कर्नाटकचा पराभव
  मुलींच्या गटात महाराष्ट्राने कर्नाटकचा ११-९ असा चार मिनिटे राखून दोन गुणांनी दणदणीत विजय साजरा करत अजिंक्यपद मिळवले. महाराष्ट्राच्या रेश्मा राठोडने कर्णधाराची खेळी करताना ३:००, २:२० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला व सरळ राष्ट्रीय स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कारवर हक्क प्रस्तापित केला. स्नेहल जाधवने २:००, २:१० मिनिटे संरक्षण केले, प्राजक्ता पवारने १:४०, २:०० मिनिटे संरक्षण करताना तीन बळी घेतले.

Trending