Home | National | Madhya Pradesh | National Para Athlete forced to beg on Bhopal streets video

Video: गळ्यात मेडल लटकवून सिग्नलवर भीक मागतोय हा राष्ट्रीय स्तराचा खेळाडू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 12:00 AM IST

शरीरावर प्लेअरची पोशाख आणि गळ्यात मेडल लटकवलेली हा भिकारी प्रत्यक्षात एक राष्ट्रीय स्तराचा खेळाडू आहे.

 • भोपाळ - शरीरावर प्लेअरची पोशाख आणि गळ्यात मेडल लटकवलेली हा भिकारी प्रत्यक्षात एक राष्ट्रीय स्तराचा खेळाडू आहे. ज्या देशासाठी दिवसरात्र एक करून इतकी मेहनत केली आणि मेडल मिळवला. त्याच देशाच्या रस्त्यांवर आणि सिग्नल उभा राहून तो लोकांना भीक मागण्यासाठी विवश आहे. नरसिंहपूर जिल्ह्यातील दिव्यांग नॅशनल अॅथलीट मनमोहन सिंह लोधी असे त्याचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो मध्यप्रदेशच्या राजधानीत चिल्लर गोळा करत आहे.

  काय आहे प्रकरण?
  मनमोहन सिंह लोधीने सांगितल्याप्रमाणे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्तराच्या या विकलांग खेळाडूला सरकारी नोकरीचे आश्वासन दिले होते. भोपाळच्या चकरा लावून तो कंटाळला तरीही अद्याप काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर काहीच हालचाली होत नसल्याचे पाहता त्याने सरकारचा विरोध करण्यासाठी हा मार्ग निवडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून आपल्याला सरकारी नोकरी मिळावी या मागणीसाठी तो भोपाळच्या रस्त्यांवर भीक मागत आहे. त्यातून मिळालेल्या पैश्यातून तो आपले पोट भरत आहे.

  एका अपघातात गेला हात
  मनमोहन नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगांव तालुक्यातील रहिवासी आहे. 2009 मध्ये एका अपघातात त्याचा हात कापला गेला. तरीही परिस्थितीपुढे त्याने हात टेकले नाही. कठोर मेहनत घेऊन त्याने धावण्याच्या अनेक स्टेट आणि नॅशनल स्पर्धांमध्ये आपले नाव करून मेडल मिळवले. 2017 मध्ये अहमदाबाद येथे आयोजित 100-200 मीटर रेसमध्ये त्याने सिलव्हर मेडल जिंकला होता. 2017 मध्ये मनमोहन सिंह लोधीला मध्यप्रदेशचा सर्वोत्कृष्ठ विकलांग खेळाडू घोषित करण्यात आले होते.

 • National Para Athlete forced to beg on Bhopal streets video
 • National Para Athlete forced to beg on Bhopal streets video
 • National Para Athlete forced to beg on Bhopal streets video

Trending