आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Population Register: Narendra Modi, Government Take Up Proposal For National Population Register (NPR) Updation Funds

यंदा अॅपवरून होणार जनगणना, 6 महिन्यांमध्ये होणार पूर्ण; प्रकाश जावडेकर यांची माहिती

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या पद्धतीनुसार होणार भारताची जनगणना
  • राष्ट्रीय लोकसंख्या रेजिस्टर अपडेटसाठी 8500 कोटी रुपयांचा निधी मंजूर

नवी दिल्ली - एनआरसी आणि नागरिकत्व कायद्यावरून देशात वाद सुरू असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रेजिस्टर (एनपीआर) अपडेट करण्यास मंजुरी दिली आहे. एनपीआर अपडेशनसाठी लागणारा निधी सुद्धा कॅबिनेटकडून मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय नागरिकांचा डेटा अपडेट होणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये एनपीआर अपडेट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. उल्लेखनीय बाब म्हणजे, एनपीआरसाठी माहिती गोळा करण्याचे काम 2010 मध्ये सुरू झाले होते. 2011 च्या जनगणनेसाठी हे आकडे घेण्यात आले होते. तसेच 2015 मध्ये ती माहिती अपडेट करण्यात आली होती. त्याचे डिजिटलीकरण पूर्ण झाले आहे.


देशात 16 वी जनगणना ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या पद्धतीनुसार होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. यंदाची जनगणना ही अॅपच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी कुणालाही बायोमॅट्रिक डिटेल्स देण्याची गरज नाही. सोबतच, संपूर्ण जनगणनेची प्रक्रिया 6 महिन्यांमध्ये पूर्ण होईल असेही जावडेकर यांनी सांगितले आहे.


जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 च्या जनगणनेसाठी 8,754 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अर्थात एनपीआरसाठी 3,941 कोटी 45 लाख रुपयांना मंजुरी मिळाली. जनगणनेची प्रक्रिया ही स्वतः अॅपच्या माध्यमातून करता येईल. यासाठी कुठल्याही कागदपत्रांची किंवा बायोमॅट्रिकची गरज राहणार नाही. याबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल भूजल योजनेला देखील मंजुरी दिली. त्यास 6000 कोटी रुपये खर्च येईल त्याला देखील कॅबिनेटचे अप्रूव्हल मिळाले आहे. पुढील 5 वर्षांमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांना होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...