आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी घेत आहेत तमाशाचे धडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थी करताहेत हा अभ्यास, मुंबई-दिल्लीत करणार प्रयाेग
  • विविध भाषिक तरी कळताेय तमाशा

पीयूष नाशिककर 

नाशिक - महाराष्ट्राची सर्वाेच्च लाेककला असलेल्या तमाशाचे धडे सध्या एनएसडीचे विद्यार्थी घेत आहेत. नाशिकच्या तामसवाडी येथील जत्रेत विठाबाई नारायणगावकरांच्या तमाशा खेळात नुकत्याच या विद्यार्थ्यांनी तमाशा जाणून घेतला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनीच बसविलेल्या तमाशाचे प्रयाेग मुंबई आणि दिल्लीतही हाेणार आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चालविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात दिल्लीस्थित एनएसडीचे २६ विद्यार्थी सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरून तमाशा या विषयाचा सखाेल अभ्यास करत आहेत. मंुंबई विद्यापीठातील लाेककला विभागाकडे स्टुडंट क्लचरल एक्स्चेंज प्राेजेक्ट अंतर्गत विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे आणि मिलिंद इनामदार यांच्याकडे साेपविण्यात आली आहे. याबद्दल चंदनशिवे म्हणाले की, एनएसडीच्या द्वितीय वर्षांतील देशभरातून आलेल्या २६ विद्यार्थ्यांसाठी एका राज्यातील लाेककला शिकण्याचा प्रकल्प देण्यात आलेला असताे. त्यापैकी यंदा त्यांनी महाराष्ट्रातील तमाशा हा विषय देण्यात आला आहे. त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने तमाशा शिकविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि विशेष म्हणजे हे विद्यार्थीदेखील अत्यंत उत्साहाने, कुतुहलतेने हा विषय शिकत असल्याचेही चंदनशिवे म्हणाले. १८ डिसेंबरला या विद्यार्थ्यांचा हा अभ्यास सुरू झाला आहे. विद्यार्थी करताहेत हा अभ्यास


देशभरातून आलेले हे विद्यार्थी तमाशा हा फाॅर्म समजावून घेत असताना त्याचा इतिहास, थिअरी, यातील महत्त्वाचे कलावंत, त्यांनी तमाशासाठी केलेले प्रयत्न, गण, गवळण, बतावणी, वग यातील कलाकार हे सगळंच समजावून घेत आहेत. याबराेबरच केवळ पुस्तकापुरता किंवा मार्कांपुरताच अभ्यास नाही तर प्रत्यक्ष तमाशा कलावंत कसे जगतात, त्यांचे दाैैरे कसे असतात, त्यांचं आर्थिक नियाेजन कसं असतं असं सगळंच आम्ही समजावून घेत असल्याचं यांच्यातील विद्यार्थिनी नुपूर चितळे हिने सांगितले. मुंबई-दिल्लीत करणार प्रयाेग


हे २६ विद्यार्थ्यांनी केलेल्या या अभ्यासानंतर आता त्यांची तमाशा खेळाची तयारी सुरू झाली आहे. मुंबईत रवींद्र नाट्यमंिदरात २० आणि २१ जानेवारीला त्यांचे प्रयाेग आहेत तर दिल्लीत ४ प्रयाेग आहेत. यातील नृत्य, वादनापासून सर्व तयारी, गीते यावरही विद्यार्थीच काम करत आहेत. 

विविध भाषिक तरी कळताेय तमाशा


हे २६ विद्यार्थी देशाच्या विविध राज्यांतील विविध भाषिक आहेत. भाषेची कुठेतरी अडचण येईल अशी शंकेची पाल चुकचुकली हाेती. पण, नाटक, नाैटंकी, यक्षगान, कलगीतुरा असेच विविध भाषेत असतात, ते आपल्याला समजत असतात.आतातर या विद्यार्थ्यांना तमाशा बऱ्यापैकी कळला आहे .
 - गणेश चंदनशिवे, लाेककला विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ
 

बातम्या आणखी आहेत...