आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात होणार ऑलिम्पिकच्या धर्तीवर मल्लखांबाची माेठी स्पर्धा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती  - देशातील पारंपरिक खेळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली.तसेच मल्लखांबासारख्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या खेळाच्या देशात आॅलिम्पिकच्या धर्तीवर स्पर्धा घेतल्या जातील, अशी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली.  मल्लखांब हा खेळ देशभरातच लोकप्रिय आहे. खो-खो, आट्यापाट्या, लाठीकाठी, लेझीम अशा खेळांनाही पुन्हा मानाचे स्थान िमळावे म्हणून क्रीडा मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत. या क्रीडा प्रकारांसाठी आर्थिक मदत, साहित्य देण्यासाठी  प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले.  योगासारखीच इतर खेळांना पुढे आणून सर्वसामान्यांमध्ये त्याची आवड निर्माण केली जाईल.  

मल्लखांबाचा झपाट्याने प्रसार होणार
देशात आॅलिम्पिक धर्तीवर जर मल्लखांब स्पर्धा घेण्यात आली तर जागतिक स्तरावर मल्लखांबचा झपाट्याने प्रचार व प्रसार होईल. देशासह एचव्हीपीएममध्ये महिलांचा रोप, पुरुषांचा पोल मल्लखांब यासह काचेच्या बाटलीवरील, बांबूवरील, पाण्यावरील तरंगता, शस्त्रे हाती घेऊन, हँगिंग, सायकलवरील असे अनेक मल्लखांबचे प्रकार असून ते या खेळाला आणखी रोमांचक बनवितात. 
- विलास दलाल, साई मल्लखांब प्रशिक्षक, एचव्हीपीएम.

विदेशी काेचला मल्लखांबाची भुरळ;  जागतिक स्तरावर चालना मिळण्यासाठी मार्केटिंग गरजेचे 
लंगाेटी घातलेले चार युवा खेळाडू, जमिनीत पुरलेला लाकडी गुळगुळीत असा स्तंभ आणि काही अंतरावर असलेले काेच, याच साऱ्या चित्राने तलवारबाजीचे विदेशी प्रशिक्षक अल्बर्ट पेत्रू, मार्काेस आणि गेनेडी अवाक् झाले. त्यामुळे प्रशिक्षणाकडे वळणारी त्यांची पावले हाॅलच्या बाहेर थबकली. दरम्यान, युवा खेळाडूंनी केलेल्या मल्लखांबाच्या एकापेक्षा एक सरस आणि वेगळ्या कसरतींनी त्यांना चांगलीच भुरळ पाडली. ही  प्रात्यक्षिके पाहून त्यांनी मार्केटिंगच्या आधारे जागतिक स्तरावर मल्लखांबाला चांगली आेळख मिळू शकेल, अशी प्रतिक्रियाही  व्यक्त केली.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात  साई तलवारबाजीच्या प्रशिक्षकांच्या प्रशिक
्षण शिबिराचे आयाेजन करण्यात आले. याच शिबिरासाठी फ्रान्स,  आफ्रिका आणि राेमानियाचे काेच आले. यादरम्यान विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते.

मल्लखांबाला जागतिक स्तरावर माेठी आेळख मिळेल
महाराष्ट्राला मल्लखांबाचा माेठा वारसा लाभला आहे.  यासाठी  खेळाडू सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हा जुना खेळ तग धरून आहे. या खेळाच्या जागतिक स्तरावरील प्रसार आणि प्रचाराची माेठी गरज आहे. यासाठी या खेळाची मार्केटिंग गरजेची आहे. यातून मल्लखांबाला जागतिक स्तरावर माेठी आेळख मिळेल आणि युवांच्या प्रतिभेलाही वेगाने चालना मिळेल.   
  मार्काेस हेबर्ड, काेच, फ्रान्स

याेगाप्रमाणेच मल्लखांबाचे महत्त्व वाढणार; माेहिमेतून फायदा
भारतातील याेगाने आजच्या घडीला जागतिक स्तरावर आपली वेगळी आेळख निर्माण केली आहे. या याेगाप्रमाणेच आता चांगल्या मार्केंटिंग आणि प्रसाराने मल्लखांबाचेही आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व वाढणार आहे. त्यामुळेच यासाठी याेग्य प्रकारच्या पुढाकाराची गरज आहे. यातून विदेशामध्येही मल्लखांबाला चालना मिळेल.  मल्लखांबाच्या केलेल्या प्रात्यक्षिकांनी मन भारावून गेले.  
- अल्बर्ट पेत्रू, काेच, राेमानिया


संतुलन आणि चपळाईची सर्वाेत्तम कला
अनेक खेळ आव्हानात्मक मानले जातात. यामध्येच भारतामधील मल्लखांबाचाही समावेश आहे.  यामधील संतुलन आणि शरीराची लवचिकता, चपळाई ही सर्वाेत्तम कला आहे. लाकडाच्या स्तंभावर पायाच्या मजबूत पकडीने विविध कसरती करणे, हे आव्हानात्मकच आहे. ही  कठीण  कला भारतामधील प्रतिभावंत युवा खेळाडूंनी आत्मसात केली, हेदेखील काैतुकास्पद आहे.  यासाठी मल्लखांबाच्या स्वरूपाला अत्याधुनिकेतेची जाेड हवी.
- गेनेडी, काेच, द. आफ्रिका
 

बातम्या आणखी आहेत...