आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा समोर काढून शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. याला आता २० वर्षे झाली असली तरी अजूनही राष्ट्रवादीची संपूर्ण मदार शरद पवार यांच्यावरच असल्याचे दिसून येत आहे. ७८ व्या वर्षीही शरद पवार पायाला भिंगरी लावून पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत असताना अन्य नेते मात्र तितकेसे सक्रिय दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीत एकहाती प्रचार करणारे शरद पवार निवडणुकीनंतर लगेचच दुष्काळग्रस्त दौऱ्यावर गेले आणि आता ८ जुलै रोजी तिवरे धरणफुटीमुळे बाधित झालेल्यांना भेट देणार आहेत. शरद पवार यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला तिवरे दुर्घटनास्थळी जावेसे वाटले नाही.
राज्यात शरद पवार यांनी काँग्रेससोबत सत्तेत जात एकीकडे पक्ष वाढवण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसचे महत्त्वही कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश आले आहे. ही बाब लक्षात घेऊनच काँग्रेस श्रेष्ठींनी पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवून राष्ट्रवादीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी काही प्रमाणात त्यात यश मिळवले, परंतु राज्यात शरद पवार यांचे खंबीर नेतृत्व असल्याने त्यांना त्यात यश आले नाही. शरद पवार यांनीच पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारल्याचे वक्तव्य केले. केवळ शरद पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा जास्त यश मिळवले. त्यानंतर लगेचच शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली.
खरे तर राष्ट्रवादीत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ अशी मोठी फळी आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे हे नेते चांगलेच आक्रमक झाले असून सरकारला धारेवर धरत आहेत. परंतु ज्याप्रमाणे शरद पवार यांची राज्यातील राजकारणावर पकड आहे त्याप्रमाणे त्यांची नसल्याने पवारांनाच मैदानात उतरावे लागत आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नाही
राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या आल्या, परंतु शरद पवार असे कधीही करणार नाहीत. उलट राज्यातून काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा ते प्रयत्न करत असून त्या दृष्टीनेच ते २४ तास काम करू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी प्रचाराचा धडाका उडवला होता. त्या मानाने राष्ट्रवादीचे अन्य नेते प्रचारात म्हणावे तसे सक्रिय नव्हते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.