आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार...? राहुल गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाच्या राजकारणतून मोठी घडामोड समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत सध्या बैठक होत आहे. या बैठकीनंतर ही माहिती समोर आली, पण याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीये. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. पवार-राहुल यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


मूळ काँग्रेसमधून फुटून निर्माण झालेल्या सर्व पक्षांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. पक्ष मजबूत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. पक्षातून एक मोठे नेतृत्व निर्माण करणे, जो साधारण 40 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या धोरणाचा भाग होता. आता त्याच प्रकारची कार्यपद्धत पुन्हा अवलंबण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केल्यास लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येऊ शकते.

 

आज सकाळी काँग्रेस प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी कुणी प्रवक्त्यांनी पुढचा महिनाभर न्यूज चॅनेल डिबेटमध्ये भाग घेऊ नये हे केलेले ट्विट या प्रयत्नांचा भाग आहे. काँग्रेसला या मोहिमेला यशस्वी करायचे आहे, अशी माहिती मिळत आहे.


काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शरद पवार हेच या नव्या पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार हेच या पक्षाचे पहिल्या दिवसांपासून सर्वेसर्वा राहिले आहेत.


मनगटावरील घड्याळ आणि त्यात 10 वाजून 10 मिनिटे झालेला वेळ, सोबत दोन स्टँड आणि अलार्म बटण, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरुवातीपासूनच निवडणूक चिन्ह आहे. शिवाय पक्षाच्या झेंड्यावर हिरवा, केसरी आणि पांढरा असा तीन रंगाचा झेंडा आणि मधोमध पक्षाचा चिन्ह आहे. पण सध्याच्या लोकसभा निवडणुकीत दोन्हीही पक्षांना यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी वाटचालीसाठी हा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 


पवारांनी वृत्त फेटाळले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्यानंतर शरद पवार यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे म्हणत हे वृत्त फेटाळले आहे. राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याचे त्यंनी सांगितले. तसेच राज्यातील दुष्काळाबाबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षपदाला दुसरा पर्याय दिसत नसल्याने राहुल गांधींनी राजीनामा देणे योग्य नाही, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...