Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Nationalist youth Congress has decided to protest against the government

दर पडल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाटले कांदे

प्रतिनिधी | Update - Dec 08, 2018, 08:27 AM IST

भाजप सरकारला शेतकरी रडवणार

  • Nationalist youth Congress has decided to protest against the government

    सोलापूर- लाखो रुपये खर्चून करून उत्पादित केलेल्या कांद्यास योग्य दर मिळत नाही, दुसरीकडे सरकार कांद्याचे दर वाढण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाही. भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शुक्रवारी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थ चौकात नागरिकांना तब्बल दोन टन कांदा मोफत वाटण्यात आला.


    कांदा मोफत मिळतोय म्हटल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी कांदा घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकारचा धिक्कार असो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे भाजप सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकारचा निषेध असो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळालीच पाहिजे आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रशांत बाबर, रमीज कारभारी, चिंतामणी सपाटे, अजित पात्रे, अहमद मासुलदार, विवेक फुटाणे, रियाज अत्तार, जहीर गोलंदाज, अल्ताफ कुरेशी, राहुल वाल्मीकी, विशाल झळके, अंबादास हजारे, सलमान शेख, सागर चव्हाण, महेश पवार, कल्पेश गायकवाड, पिंटू जक्का, अरुण गोगुलु, मुजमिल तांबोळी, रोहन उडानशिव, विक्रांत खुने, खालिद जमखंडी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


    भाजप सरकारला शेतकरी रडवणार
    सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील म्हणणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः जेरीला आणले आहे. कांदा पिकविताना झालेला खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकरी आपला कांदा टाकून देत आहेत. बाजार समितीमध्ये कांदा केवळ पाच ते दहा रुपयाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या भाजप सरकारला आगामी निवडणुकीत हाच शेतकरी रडविल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केले.

Trending